🕒 1 min read
मुंबई : दसरा मेळावा वरुन एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटामध्ये राजकरण तापलं आहे. शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षाचा देसरा मेळावा कोण घेणार असी चर्चा सुरु असतानाच शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी मात्र दसरा मेळाव्याबद्दल मोठं विधान केलं आहे.
भरत गोगावले काय म्हणालेः
दसरा मेळावा संदर्भात आम्ही तयारीला लागलो आहे. शिवाजी पार्क किंवा बिकेसी मैदानावर करू, या संदर्भात उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली आहे. यामध्ये ठरेल. पण प्रथम प्राधान्य शिवाजी पार्कमध्ये असणार आहे, असं गोगावले यांनी सांगितलं.
आम्हाला जिथे जागा मिळेल तिथे आम्ही मेळावा करू, बाळासाहेब यांचे विचार दाखवून देऊ, कोणाला बोलवायचं हे उद्याच्या बैठकीत ठरेल, असंही गोगावले यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बुधवारी मुंबईत होणार आहे. या बैठकीत दसरा मेळाव्या संदर्भात पूर्व तयारीचा आढावा घेतला जाणार आहे
दरम्यान, एकनाथ शिंदेनी बंड करुन ठाकरे सरकारला सोडचिठ्ठी दिली. एवढंच नाही बंड केल्यानंतर शिंदेंनी शिवसेनावर दावा केला आहे. त्यामुळे शिवसेना कोणाची याच्या सुनावणी कडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Atul Bhatkhalkar | शरद पवारांच्या एंट्रीला लावलेल्या ‘त्या’ गाण्यावरुन अतुल भातखळकर म्हणाले…
- Ajit Pawar | राष्ट्रवादीतही भूकंप होणार? अजित पवारांच्या भूमिकेमुळे शरद पवार तणावात!
- Ajit Pawar | राज्यात अजूनही पालकमंत्री नसल्याने अजित पवार संतापले, म्हणाले…
- Ajit Pawar | “गर्दी जमवण्याची वेळ आली असेल तर…”; अजित पवारांचा एकनाथ शिंदेंवर हल्ला
- Sada sarvankar | सदा सरवणकरांना गोळीबार करणं पडलं महागात, पिस्तुल ताब्यात घेण्यासाठी पोलीस दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
