🕒 1 min read
मुंबई : शनिवारी रात्री मुंबईच्या प्रभादेवीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि शिवसेना पक्षाचे शिवसैनिक एकमेकांना भिडले. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. याच पाश्वभूमीवर सरवणकर यांच्यासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सदा सरवणकर यांच्या घरी पोलीसः
पोलीस हे सरवणकरांच्या घरी पोहोचले असून त्यांच्याकडील पिस्तुल ताब्यात घेणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. तक्रारीनंतर पिस्तुल चालवल्याप्रकरणी त्यांच्यावर कलमं लावण्यात आली आहे. सध्या त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
दरम्यान, गणपती विसर्जनावेळी आमची मिरवणूक चांगली झाली. आमच्या मिरवणुकीपुढे ठाकरे गट फिका पडला. त्यामुळे ही मारहाण केली गेली असल्याचा आरोप संतोष तेलवणे यांनी केला आहे. या प्रकरणावरुन 50 शिवसैनिकांवर दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यांचा जामीन झाल्यानंतर मातोश्रीवर त्यांचं कौतुक करण्यात आलं होतं.
महत्वाच्या बातम्याः
- Neelam Gorhe | “नितेश राणेंच्या हातात मच्छर मारायची बॅट, त्याने…” ; नीलम गोऱ्हेंची टीका
- Uday Samant | नाना पटोलेंसमोर रिफायनरी विरोधकांकडून उदय सामंतांना जाळून टाकण्याची धमकी
- Anil Parab | अखेर पर्यावरण विभागाकडून आदेश! अनिल परबांचं रेसाॅर्ट होणार जमीनदोस्त
- Randas Athawale | “मनसेला सोबत घेऊ नका…”; भाजप-मनसे-शिंदे गटाच्या युतीवर रामदास आठवलेंचं वक्तव्य
- Devendra Fadnavis | शिवसेनेतील बंडावर देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य! म्हणाले, एक व्यक्ती जबाबदार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
