Share

Ajit Pawar | “गर्दी जमवण्याची वेळ आली असेल तर…”; अजित पवारांचा एकनाथ शिंदेंवर हल्ला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची औरंगाबादमध्ये सभा आहे, त्यासाठी त्यांनी अंगणवाडी सेविकांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले असल्याची मािहिती समोर आली आहे. यावरून राज्यात खूप चर्चा रंगत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी या मुद्यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले अजित पवार ?

गर्दी जमवण्यासाठी आत्ताच्या मुख्यमंत्र्यांवर ही वेळ आली असेल, तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, असं म्हणत अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला केला आहे. विधानभवनातील वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत घेण्यात आली. त्यावेळी अजित पवार बोलत होते.

पुढे अजित पवार म्हणाले की, 8 सप्टेंबर 2022 ला एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या औरंगाबादमधील अधिकाऱ्यांनी खुशाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 12 सप्टेंबरच्या पैठण मतदारसंघातील सभेला प्रकल्पातील सर्व पर्यवेक्षिका, ४२ गावांमधील अंगणवाडी सेविका, मदतनीसांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनाही सूचना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात अशी पद्धत कधीच नव्हती.

तसेच, ही सभा एकनाथ शिंदेंची राजकीय सभा असेल तर अशाप्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांना बोलावण्याचं काहीच कारण नाही. त्याचबरोबर अंगणवाडी सेविका, मदतनीस सभेला गेल्या तर तेथील मुलांनी काय करायचं, ते कुठे जाणार? त्या मुलांकडे लक्ष कोण देणार?, असे सवालही अजित पवार यांनी या ठिकाणी उपस्थित केले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!