🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केल्यापासून अनेक पक्षातील नेते त्यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी राज्यातील राजकारणात खूप खळबळ माजली होती. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्याने पक्षाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर येतं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्या नेत्याने दिला राजीनामा?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी पक्षाला राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा दोन दिवसांपूर्वीचं दिला असल्याचं समजतं आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी हालचाल पाहायला मिळतं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी हा राजीनामा का दिला?, यामगचे कारण देखील अशोक गावडे यांनी सांगितले आहे.
जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे आणि काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत आलेल्या उपऱ्या नेत्यांचा नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रमाणाच्या बाहेर हस्तक्षेप वाढला आहे. गटबाजीला उधाण आलं आहे. हे सर्व मी कित्येक दिवसांपासून सहन करत होतो आणि याबद्दल मी वेळोवेळी वरिष्ठांकडे तक्रारही केली, परंतु दखल घेतली जात नसल्यानं मी राजीनामा दिला असल्याचं अशोक गावडे यांनी सांगितलं आहे.
तसेच, मी पडत्या काळात पक्षासाठी निस्वार्थीपणाने तन मन धनाने कामं केली. शरद पवार साहेब हे कायम माझ्या आदरस्थानी होते व राहतील, असं त्यांनी बोलून दाखवलं. त्याचप्रमाणे अशोक गावडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत असल्याचंं बोललं जात आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कंचं मैदान कोण मारणार?, अजित पवार म्हणाले…
- Lumpy Skin Disease | लंपी आजाराने राज्यात ३२ गुरांचा तर जळगाव जिल्ह्यात १२ गुरांचा मृत्यू
- Rohit Pawar । “भाजपाच्या नेत्यांनी बारामतीत आलंच पाहिजे, अन्…”; रोहित पवारांचं आव्हान
- Sachin Tendulkar | ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथच्या निधनानंतर सचिन तेंडुलकर म्हणाला…
- Ajit Pawar | “कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते” ; अजित पवारांची बावनकुळेंवर खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

