Share

Ajit Pawar | दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कंचं मैदान कोण मारणार?, अजित पवार म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

पुणे : एकनाथ शिंदे यांनी भाजप पक्षासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केलं आहे. तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि शिंदे गटामध्ये सतत आरोप-प्रत्यारोपाची खेळी सुरू असते. सध्या शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्कंच मैदान कोणाला मिळाणार?, ही चर्चा सगळीकडे सुरू असते. अशातच याच मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आजित पवार यांनी एक वक्तव्य केलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

शिवसेना आणि शिंदे गटाने त्यांच्या परिने मेळावे घ्यावेत. मेळावा घेण्याचा मान बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या मैदानात सांगितलं होत की, यापुढे शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील. शिवसैनिक त्याच गोष्टीला प्रतिसाद देतील, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

आज आजित पवार यांनी पुण्यामध्ये प्रसारमाध्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कंचं मैदान कोण मारणार?, असा सवाल विचारला असता त्यावर ते बोलत होते.

तसेच, अजित पवार यांनी त्यावेळी बोलताना भाजपवरही निशाणा साधला होता. गेल्या 55 वर्षांत असे कितीतरी जण आले आणि कितीतरी जण गेले. खूप लाटा आलेल्या आणि गेलेल्या बारामतीकरांनी पाहिल्या आहेत. बारामतीकरांना खूप चांगलं माहितीये की कुणाचं बटण कशा पद्धतीने दाबायचं.
महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!