🕒 1 min read
मुंबई : देशात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य लोक त्रस्त आहेत. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यापूर्वी देखील प्रत्येकाला दहा वेळा विचार करावा लागत आहे. अशातच आता पुन्हा एकदा शिंदे आणि फडणवीस सरकार सर्वसामान्य ग्राहकांना विज दरवाढ करण्याचा धक्का देणार आहेत.
शिंदे आणि फडणवीस सरकार यांचा निर्णय-
विजेच्या इंधन समायोजन शुल्काच्या दरात पुन्हा एकदा 60 ते 70 पैशांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे. वीज खरेदी खर्चातील वाढीपोटी महावितरणने 1500 कोटी रुपये राखीव ठेवले होते. मात्र तो निधी 2021 मध्ये संपला. त्यामुळे महावितरणाने 1 एप्रिल 2022 मध्ये खरेदीच्या वाढीपोटी इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरुवात केली.
60 ते 70 पैशांची होणार वाढ-
पुढील महिन्यात महावितरण 60 ते 70 पैशांची वाढ करणार आहे. अर्थातच राज्यात विजेच्या दरात 10-20 टक्के वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. त्यामुळे इंधन शुल्काचा दर हा दोन रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, याआधी महाराष्ट्र वीज नियंत्रण मंडळाने 1 जून पासून वीज कंपन्यांना चार्ज लावण्यास परवानगी दिली आहे. दोन वर्षांमध्ये कोरोना काळात कोणतीही दरवाढ करण्यात आली नव्हती. तसेच कोणतेही दर आकारण्यात आले नव्हते. त्यामुळे हा निर्णय घेतला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena । मेल्या आईचे दूध प्यायलेले नाहीत याचे भान राखा; शिवसेनेचा भाजपाला इशारा
- Mumbai : गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल, आज ठरणार का BMC निवडणूकीची रणनीती..!
- Ambadas Danve | शिवसैनिकांना शोधून मारणारा अजून जन्माला यायचाय; दानवेंचं गायकवाडांना प्रत्युत्तर
- IND vs PAK । “बाबर आझमने या क्रमांकावर फलंदाजी केली, तर भारताविरुद्ध… “; सामन्यापूर्वीच माजी खेळाडूच मोठे विधान
- Cyrus Mistry Death । टाटा ग्रुपचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा पालघरमधील रस्ते अपघातात मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
