Share

Ajit Pawar | बारामतीच्या विकासावर राज्यातील सत्तांतराचा परिणाम होणार नाही! – अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

बारामती : राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामतीकरांना स्पष्ट दिलासा दिला आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे बारामतीच्या विकासावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे.

अजित पवार – बारामती विकासावर सत्तांतराचा परिणाम होणार नाही

बारामती मधील नटराज नाट्यकला मंडळाच्या कलादानाचे तसेच बारामती गणेश फेस्टिवलचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी बारामतीच्या विकासाबाबत भाष्य केलं. राज्यात सत्ता येत जात राहते, मात्र याचा परिणाम बारामतीच्या विकासावर होणार नाही, असं अजित पवार म्हणाले. बारामती मध्ये वसंतराव पवार नाट्यगृहाचे नूतनीकरण केलं जात असून लवकरच त्या ठिकाणी भव्य वास्तू उभी राहील, तसेच बारामतीचा सर्वांगीण विकास होताना सांस्कृतिक विकासाला ही तितकच महत्त्व असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

शहराला नदीच्या पुराचा धोका राहणार नाहीः

कऱ्या नदीच्या सुशोभीकरणाच्या कामानंतर आता बारामती शहराला नदीच्या पुराचा धोका राहणार नाही, नदीचं अतिरिक्त पाणी शहराच्या विविध भागात येणार नाही, अशी अपेक्षा अजित पवारांनी यावेळी व्यक्त केली आहे. तसेच क्रीडा संकुलाचे विकासासाठी आणखीन 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणण्याचे काम देखील ते करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, प्रशासकीय भवन लगत असलेल्या 9 एकरांच्या जागेत अतिशय सुंदर उद्यान विकसित करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली असून नवीन उद्यानासह बारामतीतील इतर सर्व उद्यानांची अवस्था बदलून व्यवस्थित केली जाईल, असें देखील अजित पवार यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्याः 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!