Share

Nana Patole | “ईडी सरकारच्या वागण्यातून स्वत:ची…” ; नाना पटोलेंची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  एकनाथ शिंदे यांनी भाजप पक्षासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यामुळे महाविकास आघाडीमधील पक्षनेते राज्य सरकारवर सतत आरोप, टीका करत असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकार वर निशाणा साधला आहे.

नाना पटोले यांची राज्य सरकारवर टीका-

नाना पटोले यांनी सरकारवर महागाईच्या मुद्यावरून टीका केली आहे. ते म्हणाले की, जनतेचे सरकार आले आहे असे बॅनर जनता नाही तर, स्वतः भाजपाच लावत आहे ! स्वत:ची पाठ स्वत:च थोपटून घेण्याचा प्रत्यय ईडी सरकारच्या या वागण्यातून येतो. यासंदर्भात पटोले यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे.

सर्वात महागडं राज्य महाराष्ट्र-

सध्याच्या स्थितीमध्ये महागाईचे आकडे पाहता सर्वात महागडं राज्य महाराष्ट्र आहे. भाजप सरकारने महागाईचा कळस गाठला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, फडणवीस सरकारच्या काळात मोठ्याप्रमाणात घेण्यात आलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी हे सरकार सामान्य नागरिकांकडून वसुली करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी राज्य सरकारवर केला आहे.

दरम्यान, नाना पटोले यांनी केलेल्या आरोपला राज्य सरकार काय प्रत्युत्तर किंवा काय प्रतिक्रिया देणार हे पाहाणं म्हत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!