Share

Narayan Rane | आमदार गद्दार नसून खरे गद्दार उध्दव ठाकरेच – नारायण राणे 

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजप खासदार नारायण राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे गटात गेलेले आमदार गद्दार नसून खरे गद्दार उद्धव ठाकरेच आहेत, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला. भाजप आणि जनतेशी गद्दारी करत ठाकरे मुख्यमंत्री झाले, असेही राणे म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरले, असा घणाघात बावनकुळेंनी केला.

नारायण राणे म्हणाले, आमदारांशी आणि पक्षाशी खरी गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली. मुख्यमंत्री पद हे गद्दारी करुन मिळवलं. भाजपशी गद्दारी केली. कडवट शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्यासारख्या लोकांशी गद्दारी केली. आमदारांना कोणत्याही प्रकारे मदत, सहकार्य आणि भेटी दिल्या नाहीत. उद्धव ठाकरेंनी जी कामे केली ती त्यांचे नातेवाईक आणि मोतोश्रीसाठी केली. त्यामुळे खरे गद्दार उद्धव ठाकरे आहेत.

उद्धव ठाकरे आता हिंदुत्ववादी राहीले नाहीत-

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “उद्धव ठाकरे आता हिंदुत्ववादी राहीले नाहीत. पारिवारिक प्रेमामध्ये सर्व गोष्टी ते विसरुन गेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनचरित्राला बगल देऊन ते आपले कामे करत आहेत.”

उद्धव ठाकरेंची भूमिका कळत नाही-

“उद्धव ठाकरेंची भूमिका कळत नाही त्यांचं हिंदुत्व खरचं बेगडी आहे. जे शरद पवार आणि काँग्रेससोबत बसतात, ते कशाला हिंदुत्वाच्या गोष्टी शिकवतात. मतदानाच्या वेळी जनता ठरवेल खोट कोण आणि खरे कोण?,” असेही बावनकुळे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!