🕒 1 min read
मुंबई : प्रसिद्ध हास्य कलाकार कपिल शर्मा याचा लोकप्रिय कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच द कपिल शर्मा शोचा लेटेस्ट प्रोमो रिलीज झाला आहे. ज्यामध्ये कॉमेडी किंग कपिल शर्मा त्याच्या शोच्या सर्व कलाकारांसोबत करताना दिसत आहे. द कपिल शर्मा शोच्या या प्रोमो व्हिडिओसह, नवीन सीझन कोणत्या दिवसापासून सुरू होईल याची माहिती देखील देण्यात आली आहे.
‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीलाः
सोनीने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर कपिल शर्मा शोचा एक नवीन प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कपिल शर्मा जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचे दिसत आहे. यासोबतच तो आपल्या शोमधील सर्व स्टार्सना ओळखून ओळख करून देतोय. पण यादरम्यान कपिलने पत्नीला ओळखण्यास नकार दिला, त्यानंतर शोच्या जज अर्चना पूरण सिंह त्याला ओढताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
https://www.instagram.com/p/ChrDlcSM0z_/?utm_source=ig_web_copy_link
जून महिन्यात जुना सीझन संपल्यानंतर सर्वजण द कपिल शर्मा शोच्या नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. खरंतर कपिल शर्माचा हा शो वर्षानुवर्षे लोकांना घरात बसून हसायला भाग पाडत आहे. टीव्हीचा सर्वोत्कृष्ट कॉमेडी शो म्हणून पुन्हा एकदा कपिल शर्मा त्याच्या संपूर्ण टीमसोबत तुमच्या सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी येत आहे.
‘या’ तारखे पासून होणार शो सुरु:
द कपिल शर्मा शोचा हा लेटेस्ट प्रोमो व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. ज्या अंतर्गत कपिल शर्माच्या या शोचा हा प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कपिल शर्मा शोच्या नवीन सीझनबद्दल बोलायचं झालं तर हा कॉमेडी शो 10 सप्टेंबरपासून सोनी टीव्हीवर रात्री 9.30 वाजता सुरु होणार आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Jayant Patil | कुपोषणाच्या मुद्द्यावर जयंत पाटील आक्रमक ; आदिवासी विकास मंत्र्यांचा निषेध करत सभात्याग
- Eknath Shinde । आदित्य ठाकरे यांना डिवचणारे पोस्टर जेव्हा एकनाथ शिंदे वाचतात, तेव्हा…
- Shivsena | शिवसेना नेमकी? कोणाची कोर्टाकडून सुनावणीची नवीन तारीख
- Ajit Pawar | आदिवासी क्षेत्रातील बालमृत्यू व कुपोषणाच्या वास्तवाला सरकार मान्य करत नाही – अजित पवार
- Raj Thackeray | महाराष्ट्राचा यूपी-बिहार करायचाय का?- राज ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
