Share

Karnataka | टिपू सुलतान म्हणजे ‘मुस्लीम गुंड’ ; भाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान, जीभ कापण्याची धमकी

Published On: 

🕒 1 min read

बंगळुरू : कर्नाटकातील भाजपचे आमदार केएस ईश्वरप्पा यांनी धमकीचे पत्र मिळाल्याचा आरोप केला आहे. टिपू सुलतान म्हणजे ‘मुस्लिम गुंड’ म्हटले तर त्यांची जीभ कापली जाईल, अशी धमकी ईश्वरप्पा यांना देण्यात आली आहे. ईश्वरप्पा यांच्या म्हणण्यानुसार धमकीचे पत्र त्यांच्या निवासस्थानी आले आहे. कर्नाटकमध्ये स्वातंत्र्यदिनी टिपू सुलतान आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असलेले बॅनर लागल्याने वाद निर्माण झाला होता.

मी असे म्हणत नाही की सर्व मुस्लिम गुंड आहेत-

ईश्वरप्पा म्हणाले की त्यांनी सर्व मुस्लिमांना कधीही ‘गुंड’ म्हटले नाही आणि अशा धमक्यांना मी घाबरत नाही. केएस ईश्वरप्पा यांनी कर्नाटकातील शिवमोग्गा येथे अल्पसंख्याकांवर जातीय तणाव पसरवल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले, “मला मुस्लिम समाजातील ज्येष्ठांना सांगायचे आहे की मी असे म्हणत नाही की सर्व मुस्लिम गुंड आहेत. मुस्लिम समाजातील ज्येष्ठांनी यापूर्वी शांततेसाठी प्रयत्न केले आहेत, मला त्यांना सांगायचे आहे की, गुंडगिरी करणाऱ्या तरुणांना समजावून सांगावे. नाहीतर सरकार कारवाई करेल आणि त्यांनी त्यास सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.”

 वीर सावरकरांच्या पोस्टरवरुन वाद- 

स्वातंत्र्य दिनानिमित्त अमीर अहमद सर्कलमध्ये वीर सावरकरांचे पोस्टर्स लावण्यात आले होते. त्यानंतर टिपू सुलतानच्या समर्थकांनी ती पोस्टर्स काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर शहरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर शिवमोग्गा जिल्ह्यातील काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!