🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय लाजीरवाणा प्रकार घडला आहे. विधान भवनाच्या बाहेर विरोधक यांनी खोक्यांचा नारा लावला होता. हा नारा मागे देखील लावण्यात आला होता. मात्र यावेळी ५० खोके एकदम ओकेचा नारा सत्ताधारी मंडळींना जास्तच झोंबल असून सत्ताधारक आणि विरोधी आमने सामने आले. यावेळी अमोल मिटकरी आणि महेश शिंदेमध्ये धक्काबुक्की झाली. एवढंच नाही तर या राड्यामध्ये आई-बहिणीवरुन शिव्या देखील देण्यात आल्या.
सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामनेः
लोकांच्या कल्याण्यासाठी असलेली सत्ता शेतकरी संकटात असताना विरोधकांसोबत राडा घालण्यात व्यस्त झाली आहे. यादरम्यान, लवासाचे खोके बारामती ओके, असा टोला सत्ताधारकांनी पवारांवर लगावला. एवढंच नाही तर बीएमसीचे खोके, मातोश्री एकदम ओके, असा नारा लावत सत्ताधारकांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
हा तर फक्त ट्रेलर आहेः
दरम्यान, विधानसभेच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. यानंतर दोघांमध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर तुफान धक्काबुक्की झाली. एवढंच नाही आम्हाला वारंवार खोके म्हटलं जात असल्यामुळे आम्ही देखील बोके दाखवण्यासाठी हे केलं असल्याचं सत्ताधारकांनी म्हटलं आहे. तसेच हा केवळ ट्रेलर असल्याचा इशारा सत्ताधारकांकडून देण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओः
https://fb.watch/f5AKKuLYOs/
महत्वाच्या बातम्याः
- Sharad Pawar | “बलात्काऱ्यांना सोडून देणं, हाच महिलांचा सन्मान का?”; शरद पवार यांचा नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा
- Sujit Patkar | संजय राऊत यांच्यानंतर त्यांचे मित्र सुजित पाटकर यांच्यावर होणार कारवाई
- Bihar । सत्ताबदलानंतर लगेच बिहारमध्ये ED आणि CBI चे कामकाज सुरु; आरजेडीच्या आमदार आणि खासदारांच्या घरांवर छापेमारी
- Narayan Rane | महापालिका न्यायालयापेक्षा मोठी आहे का?; राणेंच्या बंगल्याबाबत महापालिकेच्या बदललेल्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचा सवाल
- Eknath Khadse | एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केला पर्दाफाश! रोहिणी खडसे हल्ला प्रकरणी सादर केला पेनड्राइव्ह
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
