Share

Sujit Patkar | संजय राऊत यांच्यानंतर त्यांचे मित्र सुजित पाटकर यांच्यावर होणार कारवाई

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नंतर आता त्यांचे जिवलग मित्र कारवाईच्या रडारवर आहेत. सुजित पाटकर असं त्यांचं नाव असून हे संजय राऊत यांचे व्यवसायिक मित्र आहेत. सुजित यांच्यावर लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये 38 कोटींची फसवणूक करून घोटाळा केल्या प्रकरणी किरीट सोम्या यांनी आझाद मैदान पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता सुजित पाटकर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे.

संजय राऊत यांचे मित्र सुजित पाटकर यांच्या आणखीन लोकांवर गुन्हा दाखलः

महाविकास आघाडीचं सरकार असताना सुजित पाटकर यांच्या विषयी तक्रार करून त्यांच्यावर कारवाई केली जात नव्हती, अशी तक्रारही किरीट सोमवार यांनी केली आहे. संजय राऊत यांचे मित्र सुजित पाटकर यांच्यासह लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंटचे भागीदार डॉक्टर हेमंत गुप्ता, संजय शहा आणि राजू साळुंखे यांच्यावरही 38 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोटींचा घोटाळा झाल्याची तक्रार केल्यानंतर याबाबत संबंधित यंत्रणांकडून ही तपास केल्या जाण्याची शक्यता आहे.

बनावट पार्टनरशिपः

जून 2020 ते मार्च 2022 या कालावधीत लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस फर्म व फॉर्मचे भागीदार यांनी मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील वेगवेगळ्या जम्मू कोविड सेंटरला वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी काढलेल्या बीडस मिळवण्यासाठी यांनी फर्म 26 जून 2020 रोजी चे बनावट व खोटी पार्टनरशिप तयार केली. ही पार्टनरशिप खोटी व बनावट असल्याची माहिती असतानाही त्यांनी ही कागदपत्रे सादर केली. तसेच फर्मकडे वैद्यकीय मनुष्य बळ पुरवण्याचा अनुभव व ज्ञान नसतानाही त्यांच्याकडे अनुभव असल्याचं खोटं भासवून वरळी व दहिसर जंबो कोविड सेंटरचे कंत्राट प्राप्त केले होते.

लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस फर्मला 9 सप्टेंबर 2020 रोजी च्या आदेशान्वये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी त्यांना कंत्राट न देण्याबाबत लेखी कळवलं होतं. मात्र त्यांनी ही बाब जाणीवपूर्वक मुंबई महानगरपालिका यांच्यापासून लपून मुंबईतील जंबो कोवीड सेंटरच्या वैद्यकीय सेवा पुरवण्याचे कंत्राट प्राप्त केलं. लाईफलाईन फर्मने कंत्राट मधील नमूद केलेल्या अटी व शर्तीनुसार सेवा व सोई न पुरवता त्याबाबत घाईघाई हयगय केला आहे.

दरम्यान, सेंटरमध्ये उपचार दरम्यान मृत झालेल्या रुग्णांच्या मृत्यूसही कारणीभूत हेच आहेत असं तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेमध्ये दिलेल्या रक्कमेमध्ये घोटाळा केला असून कंत्राटच्या माध्यमातून अंदाजे अडीच कोटी रुपयांचा अपहार केल्याची तक्रार संजय राऊत यांच्या मित्रावर करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!