Share

Sharad Pawar | “केंद्र सरकार ‘ईडी’ सारख्या तपास यंत्रणाचा गैरवापर करत आहे”; शरद पवार आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. आपल्याला माहित आहे की, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाची खेळी सुरूच असते. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांंमध्ये अनेक नेत्यांवर ईडी ची कारवाई करण्यात आली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकार यांच्यावर हल्ला केला आहे.

लोकांचा पाठिंबा मिळत असलेल्या राजकीय पक्षाला सत्तेतून दूर करण्यासाठी केंद्र सरकार ईडी, सीबीआय यांसारख्या तपास यंत्रणाचा गैरवापर करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केला आहे. शरद पवार पक्षाच्या अल्पसंख्य विभागाच्या मेळाव्यात उपस्थित असताना त्यावेळी ते बोलत होते.दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारची सत्तेतून हकालपट्टी करण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला आहे.

तसेच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर सीबीआय कारावई झाली त्यानंतर काँग्रेसने त्यांना आपला पाठिंबा द्यायला हवा होता, असं म्हणथ भाजपला मदत होईल अशी कृती कोणत्याच पक्षाने करू नये, असा सल्लाही पवारांनी दिला आहे.

दरम्यान, पवारांनी राज्यातील भाजप पक्षावरही टीका केली आहे. देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. जिथं नव्हती तिथं आणली गेली. महाराष्ट्रातही भाजपची हुकुमत नव्हती, पण शिवसेनेचे आमदार गेल्यानं भाजपची हुकुमत आली असल्याचंं त्यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!