🕒 1 min read
मुंबई : 40 आमदारांनी बंड केल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांना पुन्हा एक धक्का मिळाला आहे. माजी आमदार अशोक पाटील यांनी शिवसेना विरोधात बंड पुकारला आहे. यावेळी त्यांनी शेकडो समर्थकांसह शिंदे गटाला समर्थन दिलं आहे. समर्थन देत असताना त्यांनी शिवसेना नेत्यांवर जोरदार निशाणा साधला.
अशोक पाटील यांनी दिलं त्यांच्या बंडचं स्पष्टीकरणः
आपल्या बंडाचं स्पष्टीकरण देत असताना शिवसेनेमध्ये माझा अपमान सुरू होता, मला प्रत्येक कार्यक्रमातून डावलण्यात येत होतं, मी शिंदे गटात जाणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात होत्या, यापूर्वीही मला उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर ठेवण्यात येत होतं, असं अशोक पाटील यांनी सांगितलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षात माझा अपमान होत होताः
गेल्या अनेक वर्षांपासून मी शिवसेनेमध्ये काम करत होतो. त्यामुळे मी आमदार झालो. मात्र माझा अपमान करणं, कार्यक्रमांमध्ये न बोलवणं, आधी पकड प्रकार सुरू होते. उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला फिरणारी मंडळी या कुरापती करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच मला अपमानाची वागणुक मिळत होती त्यामुळे मी पक्षात अस्वस्थ होतो. याबाबत मी अनेक वेळा पक्ष श्रेष्ठीशी बोललो होतो. मात्र त्याची दखल घेण्यात आली नसल्याची खंत अशोक पाटील यांनी व्यक्त केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूच्या मंडळींचा कटः
उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूंच्या मंडळींनी मला तीन वर्ष त्यांच्यापासून दूर ठेवलं. उद्धव ठाकरे यांना मी काहीतरी सांगेल या भीतीमुळे त्यांनी मला उद्धव ठाकरे पासून दूर ठेवलं, असा गंभीर आरोप पाटील यांनी केला. तर विनायक राऊत यांनी विक्रोळी मध्ये बैठक लावून माझ्या बाबत गैरसमज पसरवण्याचं काम केलं. मला काहीतरी मिळेल म्हणून मी शिंदे गटात जात असल्याच्या वावड्या विनायक राऊत यांनी उडवल्या असल्याचा आरोप अशोक पाटील यांनी करत विनायक राऊत यांनी आपल्याला धमकावलं असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
कोळी बांधव शिवसेनेवर नाराजः
यादरम्यान, कोळी बांधव देखील शिवसेनेवर नाराज असल्याचं अशोक पाटील यांनी सांगितलं आहे. कोळी बांधवांचे अनेक प्रश्न मी दिल्लीपर्यंत घेऊन गेलो. मात्र त्याच्याबाबत शिवसेनेने काही केलं नाही. त्यामुळे कुठेतरी आता हिंदुत्वाची लाट सुरू झालेली आहे आणि याच भावनेतून कोळी बांधवांना न्याय मिळावा यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या ठिकाणी मोठ्या संख्येने समर्थन देण्यासाठी आलो आणि मला न्याय मिळाला, असं वचन दिलं आहे, असं अशोक पाटील यांनी म्हटलं आहे.
विनायक राऊत यांच्यावर पाटलांचे आरोपः
दरम्यान, विनायक राऊत यांनी मला सभेमध्ये हिणावण्याचा प्रयत्न केला होता. मी गप्प होतो, असं देखील उद्धव ठाकरे यांना मी सांगितलं. आता मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका कारण ती वेळ निघून गेलेली आहे, असा गंभीर इशारा अशोक पाटील यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Uddhav Thackrey | उद्धव ठाकरे यांनी बैठकीत आमदारांना दिल्या ‘या’ विशेष सूचना, जाणून घ्या
- Karuna Sharma । “मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं जातंय”; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
- Sachin Ahir | मातोश्रीवर झालेल्या बैठकीची सचिन अहिर यांनी दिली माहिती, ‘या’ विषयांवर झाली चर्चा
- Shivsena | जे वाजपेयी आणि आडवाणी या मायबापांना विसरले ते बाळासाहेबांचे स्वप्न कसले साकारणार?, शिवसेनेचा भाजपाला सवाल
- Rana Couple | हनुमान चालिसाप्रकरणी राणा दाम्पत्य यांना दिलासा, जामीन रद्द करण्याची मागणी फेटाळली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
