🕒 1 min read
मुंबई : शिंदे गटातील आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात शिवसेनेने याचिका दाखल केली होती. या अपात्रतेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. मात्र आज त्याची सुनावणी होणार आहे. अशातच शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी ट्विटद्वारे शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह वाचवण्याची विनंती केली आहे.
दिपाली सय्यद यांची विनंतीः
धनुष्यबाण हे शिवसेनेते मान्यताप्राप्त मतदान चिन्ह आहे.अनेक सत्ता संघर्षाचा इतिहास बघितला तर चिन्ह गोठावण्याची अनेक उदाहरणे आहेत. धनुष्यबाण हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुखांची आठवण आहे हि ताकद कधीही शिवसेना विसरू शकत नाही.धनुष्यबाण सर्वांनी वाचवावा हि नम्र विनंती, असं ट्विट दिपाली यांनी केलं आहे.
शिंदे गटाकडून शिवसेना पक्षावर दावाः
बंडखोरपणा करुन सत्ता प्राप्त करणाऱ्या शिंदे गटाकडून शिवसेना पक्षावर दावा केला गेला आहे. मात्र, धनुष्यबाण हे शिवसेनेते मान्यताप्राप्त मतदान चिन्ह आहे. त्यामुळे याबाबत कोणताही आदेश देण्यापूर्वी किमान त्याची सुनावणी करावी, अशी अपेक्षा शिवसेनेकडून निवडणुक आयोगाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पाहा ट्विटः
धनुष्यबाण हे शिवसेनेते मान्यताप्राप्त मतदान चिन्ह आहे.अनेक सत्ता संघर्षाचा इतिहास बघितला तर चिन्ह गोठावण्याची अनेक उदाहरणे आहेत. धनुष्यबाण हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुखांची आठवण आहे हि ताकद कधीही शिवसेना विसरू शकत नाही.धनुष्यबाण सर्वांनी वाचवावा हि नम्र विनंती. @ShivSena
— Deepali Sayed (@deepalisayed) August 22, 2022
महत्वाच्या बातम्याः
- Vinayak Mete Accident । ड्रायव्हर सातत्याने जबाब बदलतो; अजित पवारांनी मेटेंच्या अपघातावर उपस्थित केली शंका
- Arvind sawant | “ही हळद उतरली की तुमची नशाही उतरेल”; अरविंद सावंतांचा इशारा
- Assembly Session 2022 | “मागच्या वेळेस जे विचार मांडले त्यालाच आता विरोध का?”; जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- Ajit Pawar | “मुख्यमंत्री देखील थेट जनतेतून निवडा” ; अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना प्रश्न
- BJP Leader | भाजप नेत्याला पत्नीने रंगेहात प्रेयसीसोबत पकडलं, भररस्त्यात नेत्याची पत्नीकडून चपलीने धुलाई, पाहा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
