🕒 1 min read
मुंबई : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुन्हा सुरु झाले आहे. आजही सत्ताधारी पक्षाचे नेते विधानसभेच्या परीसरात येताच विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी करून विधानसभेचा परिसर दणाणून सोडला. आधीच्या दोन्ही दिवशीही विरोधकांनी वेगवेगळ्या घोषणा दिल्या होत्या. तशाच घोषणा आजही त्यांनी दिल्या आहेत. ‘खाऊन-खाऊन ५० खोके, माजलेत गद्दार बोके’, ‘ईडी यांच्या घरी ते भाजपच्या दारी’, ‘गद्दारांची चाकरी, भाजपची भाकरी’, ‘स्थगिती सरकार हाय हाय’, ‘गद्दारांचं सरकार हाय हाय’, अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या.
पन्नास खोके, माजलेत बोके…
पन्नास खोके, एकदम ओके…
ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी…
राज्य सरकारविरोधात विरोधकांची जोरदार घोषणाबाजी @AjitPawarSpeaks #Maharashtra #MonsoonSession2022 pic.twitter.com/9Gbbrx6eP2— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) August 22, 2022
या घोषणाबाजीमधूनही विरोधकांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली. तसेच यावेळी त्यांनी हातात विविध घोषणा लिहलेले फलक देखील पकडले होते. मागच्या वेळी घोषणा देताना राष्ट्रवादीचे आमदार धंनजय मुंडे जोशात दिसले होते. ज्यामुळे नंतर त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी कडाडून टीका केली होती. तर आज राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे मोठ्या जोशात दिसले. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जेष्ठ नेते छगन भुजबळ, राजेश टोपे, अमोल मिटकरी यांच्यासह अनेक नेते बडे नेते उपस्थित होते.
पुणे राष्ट्रवादीचे आंदोलन
आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर महिलांनी सहभाग घेतला होता. या महिला पारंपरिक वेशात आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनात शिंदे गटातील आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारवर दहीहंडीच्या मुद्द्यावरुनही टीका करण्यात आली आहे. तर या आंदोलनाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले.
महत्वाच्या बातम्या:
- Arvind Sawant | “…नाहीतर रामराज्याची भाषा करू नका”, अरविंद सावंत यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला
- Wedding| मेटाचे माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शेरिल सँडबर्ग अन् उद्योजक टॉम बर्नथल यांनी रचला विवाह
- Kangana Ranaut| …म्हणून फिल्मफेअर अवाॅर्ड यांनी कंगणा राणावत हिचं नाॅमिनेशन घेतलं परत
- Attack On CM Convoy । मोठी बातमी : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर दगडफेक, स्थानिकांनी फोडल्या गाडीच्या काचा
- आदरणीय नेत्यांचा अपमान करणारे, हे कसले राम हे तर हराम- अरविंद सावंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
