Share

Devendra Fadanvis | आता सगळे सण जोरात, ना मुख्यमंत्री घरात बसणार ना तुम्हाला बसू देणार- देवेंद्र फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  ज्या दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं आहे. तेव्हापासून सत्ताधारी नेते शिवसेना आणि त्यांंच्या नेत्यांवर टीका करत आहेत. अशातच भारतीय जनता पार्टी (भाजपाचे) नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेना पक्षावर हल्लाबोल केला आहे. आज मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता त्यावेळी ते बोलत होते.

 उद्धव ठाकरेंवर चांगलाच निशाणा साधला-

कालची दहीहंडी जोरात, येणारे गणेश उत्सव तसेच यापुढचे सगळे सण जोरात होणार आहेत. कारण ना मुख्यमंत्री घरात बसणार ना तुम्हाला बसू देणार, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर चांगलाच निशाणा साधला आहे. पुढे ते असंही म्हणाले की, सर्वांनी कालची मुंबई पाहिली का?, तोच उत्साह, तोच जल्लोष, तिच संस्कृती, तिच परंपरा पुन्हा एकदा आपलं सरकार आल्यानंतर काय घडतं.

 65 मे से 50 निकल गये और सबकुछ बदल गये –

तसेच, व्यासपीठावर बोलत असताना मागून कितने आदमी थे? असा आवाज आला. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले. ते म्हणाले कितने आदमी थे? हा सवाल तुम्ही विचारू शकता. 65 मे से 50 निकल गये और सबकुछ बदल गया, असं ते म्हणत पुन्हा एकदा फडणवीसांनी शिवसेनेला फटकारलं.

आम्ही आमच्या विरोधकांना कामय सन्मान देतो-

इथेच फडणवीस थांबले नाहीतर, आता दोनच राहिले आहेत (उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे). परंतू आम्ही त्यांचा देखील सन्मान करतो. कारण आम्ही आमच्या विरोधकांना कामय सन्मान देतो, असंही पुढे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!