🕒 1 min read
मुंबईः मुंबई पोलीस ट्राफिक कंट्रोल रूमला पाकिस्तान मधून एक मेसेज आला असल्याचं समोर आलं आहे. मेसेजमध्ये 26/11 सारखा भयानक हल्ला पुन्हा एकदा होणार असल्याची धमकी मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीयाः
हे प्रकरण प्रचंड गंभीर असून मुंबईमध्ये पुन्हा हल्ला होण्याची धमकी देणाऱ्या नंबरचा तपास सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. हा मेसेज कोणी आणि कसा पाठवला याची चौकशी देखील सुरू असून सर्व तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत, असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे.
भारतातलेच लोक करणार मदतः
मुंबई पोलीस ट्राफिक कंट्रोल रूमला आलेल्या धमकीच्या मेसेजमध्ये होणाऱ्या हल्ल्यामध्ये भारतातलेच 6 लोक मदत करणार असल्याचं देखील दहशतवाद्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, सणासुदीच्या काळात मुंबईवर हल्याचं सावट आलं आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Devendra Fadnavis । “मागच्यावेळीच भाजपचा मुंबईत महापौर होणार होता, पण…”; फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
- Ashish Shelar | “जहाँ फडणवीस खडे, लाईन वहीसे शुरु” ; भाजपच्या मेळाव्यात आशिष शेलारांची डायलॉगबाजी
- Ashish Shelar| “शिवसेनेनं आतापर्यंत महापालिकेत फक्त भ्रष्टाचार…”, आशिष शेलार यांचा शिवसेनेवर टीकेचा बाण
- Rohit Pawar | महापालिका निवडणुकीत विजयाची हंडी फोडण्यासाठी गोविंदा आरक्षणाचा निर्णय; रोहित पवार
- Bilkis Rape Case|”बिलकीस बानू प्रकरणातील गुन्हेगार चांगल्या संस्काराचे आहेत”, ‘या’ भाजप नेत्याचं खळबळजनक विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
