🕒 1 min read
अहमदनगर : सध्या गोविंदाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात गोविंदाच्या आरक्षणाचा मुद्दा मांडला. त्यावर आता विविध संघटना आणि विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी देखील सरकारच्या या निर्णयाविरोधात आक्रमक झाले आहेत. सरकारने निर्णय मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सरकारने दहिहंडीचा समावेश हा खेळात केला याबाबत काहीच आक्षेप नाही. मात्र गोविंदाना शासकीय नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय म्हणजे देश आणि राज्यातील बेरोजगारांची सरकारने केलेली चेष्टा असल्याचा घणाघात सत्यजीत तांबे यांनी केला आहे. हा निर्णय चुकीचा आहे, सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि नोकरभरती सुरू करावी अशी मागणीत तांबे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Kailash Vijayvargiya | “परदेशातल्या स्त्रिया कधीही बॉयफ्रेंड बदलतात”; त्या वक्तव्यावर कैलाश विजयवर्गीय यांचे स्पष्टिकरण
- Mumbai Attack | मुंबई हल्याच्या धमकीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीया, म्हणाले…
- Devendra Fadnavis । “मागच्यावेळीच भाजपचा मुंबईत महापौर होणार होता, पण…”; फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
- Ashish Shelar | “जहाँ फडणवीस खडे, लाईन वहीसे शुरु” ; भाजपच्या मेळाव्यात आशिष शेलारांची डायलॉगबाजी
- Ashish Shelar| “शिवसेनेनं आतापर्यंत महापालिकेत फक्त भ्रष्टाचार…”, आशिष शेलार यांचा शिवसेनेवर टीकेचा बाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
