🕒 1 min read
मुंबई : आपल्या आजूबाजूला आपण अनेक दुर्घटना होताना पाहतो. अशीच एक दुर्घटना दहीहंडी रोजी बोरिवली पश्चिमेकडील साईबाबा नगरी येथे घडली. येथे असलेली चार मजली गीतांजली इमारत अचानक कोसळल्याने धुमाकूळ उडाला. ही इमारत धोकादायक झालेली असल्याने इमारतीला पालिका आर. मध्ये विभागाने नोटीस दिली होती. मात्र, रहिवासांनी कोर्टात धाव घेतली.
बोरीवली येथे गीतांजली इमारत दुर्घटना –
आज सकाळी गीतांजली इमारतीमधील रहिवाशांनी स्वतःहून इमारत रिकामी केली. यानंतर दुपारी 12:30 वाजेच्या दरम्यान ही इमारत अचानकपणे कोसळली. इमारत कोसळली तेव्हा कोणीही इमारतीमध्ये नव्हतं. या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहचले.
इमारत कोसळ्यामुळे झालेल्या ढिगाऱ्याखाली कोणी नसल्याचं मुंबई पालिका प्रशासनाने सांगितलं असून हा ढिगारा लवकरच रिकामा केला जाईल, अशी माहिती देखील देण्यात आली आहे.
कोणतीही जीवितहानी न झाल्याने दिलासा –
दरम्यान, हा व्हिडिओ शेअर करत ट्विटरवर अनेकांनी या दुर्घटनेबाबत माहिती शेअर केली आहे. तसेच आज राज्यभरात एकीकडे दहीहंडीचा उत्सव साजरा होत असतानाच दुसरीकडे ही दुर्घटना घडली. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी न झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे.
पाहा व्हिडीओ:
दहीहंडी रोजी बोरिवली येथील चार मजली इमारत अचानक कोसळली. मात्र. या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहाणी झालेली नाही. pic.twitter.com/dMISdGlXMg
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) August 19, 2022
महत्वाच्या बातम्या :
- रायगडच्या किनाऱ्यावर कडेकोट बंदोबस्त, जाणून घ्या शस्त्रांनी भरलेली बोट महाराष्ट्रात कशी आली?
- Ram Kadam | देशात सर्वांसाठी कायदा समान आहे – राम कदम
- Kirit Somayya । मुश्रीफांना 1500 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा हिशोब द्यावा लागणार, सोमय्यांचं ट्विट
- Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीसांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्या” ; ब्राम्हण महासंघाची मागणी
- Shraddha Kapoor | मुख्यमंत्री शिंदे आपल्या सोबत, आणखी काय पाहिजे; श्रद्धा कपूरने केले कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
