पुणे : सध्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. तसेच देशातील राजकारणही रंगात आल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यात लोकसभा निवडणूकाही तोंडावर येत चालल्या आहेत. अशातच अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निगडीत एक अनोखी मागणी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांना पुणे लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्या –
देवेंद्र फडणवीस यांना पुणे लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्याबाबत केली आहे. ही मागणी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने जे. पी. नड्डा यांना पत्र लिहून केली आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस अत्यंत कुशल राजकीय व्यक्तीमत्व आहे. मागील पाच वर्षांत त्यांनी ते सिद्ध केलं असल्याचं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस विजयाची घोडदौड कायम ठेवतील-
राष्ट्रीय राजकारणात देवेंद्र फडणवीस विजयाची घोडदौड कायम ठेवतील, असा ब्राम्हण महासंघाला विश्वास आहे. भारतीय जनता पार्टी नक्कीच देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा करून त्यांचा सन्मान करतील, अशी आशाही गोविंद कुलकर्णी यांनी व्यक्त केली असल्याचं समजतं आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे-
तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी कार्य केले. ते भारतीय जनता पार्टीचे भविष्य आहेत. भाजपाला सक्षम नेतृत्व देणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्यानंतर जी काही दोन-तीन नावं आहेत, त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल, असंही कुलकर्णी यांनी पत्रात लिहिलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Arvind Kejriwal। आता भारत थांबणार नाही…; सिसोदियांवरील कारवाईनंतर केजरीवाल आक्रमक
- PM Narendra Modi | नरेंद्र मोदींनी देशवासीयांना दिल्या जन्माष्टमीच्या शुभेच्छा, म्हणाले…
- Sameer Wankhede | “तुमको नहीं पता तुमने क्या किया” ; समीर वानखेडेंना मिळाली जिवे मारण्याची धमकी
- Thackeray vs Shinde | शिंदे आणि ठाकरे गटात ‘पोस्टर वॉर’; दहीहंडीच्या बॅनर्समुळे वातावरण तापले
- Shivsena। कोकणात सर्वात मोठा धक्का, आणखी एक आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

