🕒 1 min read
मुंबई : येणारा पाऊस धो-धो पडला तर तो दिसतो. पण सरकारी धोरणं जे तलवार चालवतात त्याचे काय? आम्ही सगळे मिळून कसायासारखे शेतकऱ्याला हळूहळू कापतो ते दिसत नाही. आम्ही सगळेच नालायक, आमच्याएवढे नालायक कुणीच नाही. जखम झाल्यावर त्यावर मीठ टाकणारी आपण औलाद आहोत. उगाच पावसाचं नाव बदनाम करायचं अशा शब्दात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेत घणाघात केला.
पक्षविरोधी कायदा संपवून टाकला पाहिजे. तुमच्या भागात एखादं नुकसान झालं, कायदा आडवा येत असेल तर मी बोलू शकत नाही कारण माझ्या पक्षाचे सरकार आहे. अमेरिकेत कुठे पक्ष आहेत? मते जनतेची आणि हुकुमशहा नेत्यांची. अतिवृष्टीत नुकसान झाल्यावर देतो किती तर ५ हजार. घराचं छप्पर पडलं. घरात काहीच राहत नाही. सगळं उद्ध्वस्त होतं. कधी कधी लाज वाटते. त्यांना ५ हजार देतात. त्यात काय होणार? असा सवालही बच्चू कडूंनी उपस्थित केला. घर द्यायचं असेल तर सर्व्हे करण्याचं गरज काय? नदी, नाल्यात जेवढे मेले नाहीत तितकेच घर पडून मेले. झोपेत माणसं मेली. मातीची घरे. घरांच्या इतक्या योजना राबवल्या जातात मग खरा लाभार्थी गेला कुठे? पडलेले घर तुम्हाला दिसत नाही. कोण आहेत ते नालायक अधिकारी? अशा अधिकाऱ्यांना लाथा मारायला हव्यात असंही बच्चू कडू संतापून म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Ramdas Athawale । शिर्डीतून लोकसभेला यावेळेस लढणार, पण पडणार नाही; आठवलेंचा दावा
- BJP । राष्ट्रवादीच्या 5 मोठ्या नेत्यांना ईडीची नोटीस येणार, भाजप खासदाराचा मोठा दावा
- Shivsena । “तिन्ही कृषी कायदे मागे घेतलायनानंतर मोदी सरकारने शेतकरी हिताचे…”; शिवसेनेचा थेट केंद्रसरकारला सवाल
- Big Breaking ! उपमुख्यमंत्र्यांच्या घरी सीबीआयची छापेमारी
- Sunil Tatkare । सागरी सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह, बोट घातक शस्त्रासह कशी आली?, तटकरेंचा सवाल

