🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि मागठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी दहिसर कोकणी पाडा बुद्ध विहार येथे जाहीर कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आपल्या भाषणात प्रकाश सुर्वे यांनी उद्धव ठाकरे गटाकडे बोट दाखवत या निवडणुकीत आपली भूमिका दाखवून देणार असल्याचे सांगितले. कामाच्या मध्ये जो येईल त्याचा हात तोडा, हात तोडता येत नसेल तर पाय तोडा. दुसऱ्या दिवशी मी जमानत घेईल, असे त्यांनी सांगितले.
ठाकरे गटाकडून तक्रार दाखल –
शिवसेनेतील शिंदे आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश सुर्वे यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “जर कोणी अरे, तूरे करत असेल तर कोणाचीही कट्टरता खपवून घेतली जाणार नाही, त्यांना मारा, प्रकाश सुर्वे इथे बसले आहेत. हात तोडता येत नसेल तर पाय तोडा, दुसऱ्या दिवशी मी जमानत घेईल, काळजी करू नका. आम्ही कोणाशीही भांडणार नाही, पण कोणी आमच्याशी भांडत असेल तर आम्ही त्यांनाही सोडणार नाही.” या चिथावणीखोर वक्तव्याच्या निषेधार्थ आता ठाकरे गटाकडून दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
प्रक्षोभक वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल –
प्रक्षोभक वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधक आज पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित करू शकतात. मुख्यमंत्री शिंदे यांचीही आज पत्रकार परिषद होणार आहे. उद्धव ठाकरे सध्या त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे प्रमुख आहेत, परंतु पक्षावर कोणाचा दावा आहे यावर कायदेशीर लढाई सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shiv Sena | तुम्ही ‘प्रति-शिवसेना’ भवन उभारलं तरी श्रद्धा आणि निष्ठेचे स्थान एकच असते; शिवसेनेचा सामानातून हल्लाबोल
- Shiv Sena । “संजय राठोडांवर ट्रकभर फुले उधळण्यात पण त्या फुलांच्या प्रत्येक पाकळीतून पुण्याच्या ‘निर्भया’ची किंकाळीच ऐकू येत असेल”
- Shiv Sena : एक शिंदे गट बारा भानगडींचा फुकट मॅटिनी शो बघायला काय हरकत आहे?; शिवसेनेचे टीकास्त्र
- Chhagan Bhujbal । तुम्हीच सत्तेसाठी आला नव्हता, तर मग आता रडता कशाला?; भुजबळांचा शिंदे गटावर निशाणा
- Chandrashekhar Bawankule | विनायक मेटेंचा घात की अपघात यासाठी तपास यंत्रणा लावली आहे – चंद्रशेखर बावनकुळे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
