🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन 39 दिवस उलटल्यानंतर आज अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजप आणि शिंदे गटात पहिला वाद रंगत आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाचे वादग्रस्त आमदार संजय राठोड यांची नियुक्ती भाजपला पसंत नाही. संजय राठोड यांच्या मंत्रीपदी नियुक्तीला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उघडपणे विरोध केला आहे. संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप आहे. दरम्यान यावर मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी देखील टीका केली आहे.
“एका संजयने महाविकास आघाडी सरकार बुडवले आता मंत्री मंडळातील हा संजय या सरकारचे जहाज बुडवेल असं दिसतंय. सब घोडे बारा टक्के”, असे ट्वीट गजाजन काळे यांनी केले आहे.
एक संजय ने महाविकास आघाडी सरकार बुडवले आता मंत्री मंडळातील हा संजय या सरकार चे जहाज बुडवेल असं दिसतंय …
सब घोडे बारा टक्के …— Gajanan Kale (@MeGajananKale) August 9, 2022
चित्रा वाघ संतापल्या-
संजय राठोड यांची शपथ घेतल्यानंतर काही वेळातच भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावर प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच राठोड यांच्यावर विरोधी पक्षनेते म्हणून आरोप केले होते.
चित्रा वाघ यांनी ट्विट केले आहे की, “महाराष्ट्राची कन्या पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येमागे कारणीभूत असलेले संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद देण्यात आले आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. ते पुन्हा मंत्री झाले असले तरी त्यांच्याविरोधात माझा लढा सुरूच राहणार आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे.”
काय आहे प्रकरण?
बीड जिल्ह्यातील टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने ७ फेब्रुवारी २०२१ रोजी पुणे येथे एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारून आपली जीव दिला होता. या गूढ मृत्यू प्रकरणाला राजकीय वळण लागले होते. ठाकरे सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांचे नाव या प्रकरणात उघड झाले होते. संजय राठोड व पूजा चव्हाण या तरुणीचे संबंध असल्याचे काही फोटो व व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर देखील संजय राठोड यांनीच पूजा चव्हाणला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा सूर उमटला होता. या प्रकरणानंतर संजय राठोड नॉट रीचेबल होते.
संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता-
या प्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. हा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिले होते. हे पत्र उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत वाचून दाखवण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या :
- Nana patole | भ्रष्टाचार करणाऱ्यांना मंत्रिपद, यातून भाजपाचा खरा चेहरा दिसतो – नाना पटोले
- Asia Cup 2022 : आशिया चषकसाठी भारतीय संघ निवडीवर माजी कर्णधार नाराज, म्हणाला…!
- Bihar Political Crisis | मोठी बातमी! “BJP-JDU युती संपली” ; आमदारांच्या भेटीनंतर नितीश कुमारांची घोषणा
- Eknath Shinde । संजय राठोडांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यानंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण
- Asia Cup 2022 : आयपीएलनंतर एकही सामना खेळला नाही, तरीही मिळाली संघात जागा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
