🕒 1 min read
मुंबई : सुमारे दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. आज पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. शिंदे गटातील आणि भाजपातील एकूण १८ आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात एकही अपक्ष आमदाराचे नाव नाही. तसेच मंत्रिपदाच्या आशेवर असलेल्या शिंदे गटातील अनेक आमदारांची मंत्रपदी वर्णी लागलेली नाही. तर या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याने विरोधकांकडून टिका केली जात आहे. तर या शपथविधी सोहळ्यासाठी भाजपचे अनेक बडे नेते उपस्थित होते. विरोधी पक्षाकडून अजित पवारही हजार होते. मात्र भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या उपस्थित नव्हत्या. त्यावरून पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. यात त्यांनी आता एक ट्विट देखील केलं आहे.
पंकजा मुंडे यांना विधान परिषद निवडणुकीतही डावलण्यात आलं होतं. त्यामुळे त्या पक्षातील इतर नेत्यांवर नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यातच आता त्यांना शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारातून देखील डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांची नाराजी आणखी वाढणार असं चित्र दिसून येत आहे. त्यातच शपथविधी पार पडताच मुंडे यांनी एक ट्विट केलं आहे. “नवनिर्वाचित मंत्री मंडळातील सर्व मंत्री महोदय यांचे अभिनंदन! महाराष्ट्र अपेक्षा ठेवून आपल्याकडे पाहत आहे. त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा. विकास आणि विश्वास याची जोड ठेवून तुम्ही सर्व जण काम करून महाराष्ट्र राज्याची भरभराट कराल अशी शुभकामना”, असं त्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.
नवनिर्वाचित मंत्री मंडळातील सर्व मंत्री महोदय यांचे अभिनंदन…. महाराष्ट्र अपेक्षा ठेवून पाहत आहे आपल्याकडे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा… विकास आणि विश्वास याची जोड ठेवून तुम्ही सर्व जण काम करून महाराष्ट्र राज्याची भरभराट कराल अशी शुभकामना ????????..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) August 9, 2022
अजित पवारांची प्रतिक्रिया
“उशिरा का होईना पण शपथविधी झाला, महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळालं. सध्या राज्यात अनेक प्रश्न निर्माण झालेत, शेतकऱ्यांच्या-नुकसानग्रस्त नागरिकांच्या समस्या आहेत. आता तरी सरकारने जनतेच्या अडचणी सोडवाव्यात. काही आमदारांबद्दल अजूनही बोललं जात आहे. काही प्रकरणांमध्ये काही लोकांना (आमदारांना) अजूनही क्लीनचीट मिळालेली नाही. अशांना पण मंत्रिमंडळात घेतलं आहे, त्यांची नावं टाळता आली असती तर बरं झालं असतं.”, असं अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- Eknath Shinde | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून व्हिडीओ कॉल करत विचारपूस
- Jayant Patil | “मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवलेल्यांनी हिंदुत्वासाठी त्याग केला…” ; जयंत पाटलांनी मारली कोपरखळी
- Supriya Sule । राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय; शिंदे-फडणवीस सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
- Ajit pawar | “काही आमदारांची नावं टाळली असती तर बरं झालं असतं”; शपथविधीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया
- CWG 2022 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला मोठं यश, २०२६ मध्ये ‘येथे’ आयोजन!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
