Share

Deepak Kesarkar । नारायण राणेंना मंत्रिपद दिल्याने उद्धव ठाकरेंचं भाजपसोबत बोलणं रखडलं – दीपक केसरकर

Published On: 

🕒 1 min read

Deepak Kesarkar । मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटातील आमदार आणि प्रवक्ते दीपक केसरकर हे अनेक गौप्यस्फोट करत आहे. केसरकर यांनी आज केलेल्या एका वक्तव्यामुळे या वादात अजून एक ठिणगी उडण्याची शक्यता आहे. केंद्रय मंत्री नारायण राणेंच्या कुटुंबाकडून आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न झाला, असं गंभीर वक्तव्य केसरकर यांनी केलं आहे.

केसरकर म्हणाले कि, उद्धव साहेबांची आणि पंतप्रधान मोदींची भेट झाली आणि जे काही मला उद्धवसाहेबांच्या आणि पंतप्रधान मोदींच्या बोलण्यातून समजत होतं की, खऱ्या अर्थाने कुटुंबप्रमुख कसा असावा, हे पंतप्रधान महोदयांनी त्याठिकाणी दाखवून दिलं. तर मोदींशी संबंध जपण्यास ठाकरेंनी तयारी दाखवली होती. 12 आमदारांचं निलंबन झालं तेव्हा भाजपसोबत बोलणी सुरु होती. नारायण राणेंचा त्याचवेळी केंद्रात समावेश झाला. राणे केंद्रात गेल्याचं ठाकरेंना आवडलं नाही आणि बोलणी रखडली, असंही केसरकरांनी सांगितलं आहे.

यानंतर पुढे केसरकर म्हणाले कि, दोन महिन्यांनी उद्धव ठाकरेंशी माझी चर्चा झाली, तेव्हा अशा लहान लहान गोष्टी होत असतात. आपली पुन्हा बोलणी सुरु होतील आणि काहीतरी चांगलं निष्पन्न होईल, असं त्यांनी मला सांगितलं. दूसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याही कानावर मी या गोष्टी घातल्या, त्यांनीही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन आपण भाजपसोबत जाण्याची मागणी करत होते. एकनाथ शिंदे यांच्याशिवाय मिलींद नार्वेकर, सुभाष देसाई, अनिल देसाई यांनाही या गोष्टींची कल्पना दिली होती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!