🕒 1 min read
Devendra Fadnavis । मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापलेलं आहे. त्यात आता आणखी वाढ झाली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं मुंबई आणि महाराष्ट्रासंदर्भात केलेलं वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आलं आहे. कोश्यारी म्हणाले कि, महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यानंतर मुंबई, ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, अस वादग्रसत्त वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेध करत अनेक प्रतिक्रिया येत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सावध प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासात आणि वाटचालीत मराठी माणसाचं योगदान खूप मोठं आहे. राज्यपालांनाही याची जाणीव असावी. मात्र एखाद्या विशेष कार्यक्रमात आपण अतिशयोक्ती अलंकार वापरतो, त्या स्थितीतून राज्यपालांचं वक्तव्य आलं असावं. याबद्दल ते स्वतः स्पष्टीकरण देतील, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यपालांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
तर दुसरीकडे मात्र मात्र भाजप नेते नितेश राणे यांनी मात्र राज्यपालांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. राणे प्रतिक्रिया देत म्हणाले कि, “राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानामुळे मराठी माणसाचा अपमान झाला असं मला अजिबातही वाटत नाही. मी स्वतः कार्यक्रमाला उपस्थित होतो. त्यांनी फक्त मुंबईला आर्थिकदृष्ट्या बळकट बनवण्यामध्ये ज्या लोकांचं, ज्या समाजाचं योगदान आहे त्याची आठवण करून दिली. त्यामुळे कुणाचाही अपमान झाला नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | “…तर ते कोश्यारी नावाचं पार्सल तुरुंगात पाठवा – उद्धव ठाकरे
- Nana Patole | राज्यपालांनी मराठी बांधवांची माफी मागावी – नाना पटोले
- Uddhav Thackeray । राज्यपालांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आलीय – उद्धव ठाकरे
- Supriya Sule : “ज्या राज्यातून आले आहेत तिथे यांना परत पाठवा”, सुप्रिया सुळे राज्यपालांवर संतापल्या!
- Chhagan Bhujbal | “उगाचंच गुजराती, राजस्थानी आणि मराठी वाद उकरून काढू नये”; छगन भुजबळांचा राज्यपालांना सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
