Share

ambadas danve । महाराष्ट्राला लाभले दिल्लीत मुजरा करणारे मुख्यमंत्री – अंबादास दानवे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते दिल्ली दौऱ्यावर जाणार होते. फडणवीसांचा अचानक दिल्ली दौरा रद्द झाला. मात्र आता पुन्हा एकदा माध्यमांना गुंगारा देत मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी पुन्हा दिल्ली गाठली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता पर्यन्त पाच वेळा मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन आलेत. आता मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर विरोधकांकडून सडकून टीका होत आहे. यावर आता शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देत टीकास्त्र सोडलं आहे.

मुख्यमंत्र्यांना चोरून दिल्ली दौरा करावा लागतोय अशी टीका करताना महाराष्ट्राला दिल्लीत मुजरा करणारे मुख्यमंत्री लाभले अशी मिश्किल टीका दानवे यांनी केली आहे. तसेच शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर हे जालन्यात येवून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत, ते तर सध्या शिवसेनेतच आहेत त्यामुळे कुणाच्याही दाव्यावर विश्वास ठेवायचा नाही असंही दानवे म्हणाले आहेत. तसेच आपण त्यांच्या भूमिकेची वाट पाहिली पाहिजे असं स्पष्टीकरण दानवे यांनी दिलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द झाला असे आधी सांगण्यात आले होते. मात्र बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झाल्याचे माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. रात्री उशिरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मंत्रीमंडळ विस्तार आणि 1 ऑगस्टच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी या दोन्ही मुद्द्यांवर नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते आहे. रात्री साडेतीनच्या सुमारास शिंदे दिल्लीतून मुंबईत परतले आहेत.

तसेच दुसरीकडे शिंदेनंतर आता भाजप नेते गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार हे दिल्लीत पोहोचले आहेत. सत्तार आणि महाजन हे चांगलं मंत्रिपद मिळावं म्हणून लॉबिंग करत असल्याचं सांगितलं जात आहे. महाजन यांनी तर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून त्यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!