🕒 1 min read
मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही दोघेच सरकारचा गाडा चालवताना दिसत आहे. कारण या सरकारच्या मंत्रिमंडळाचा आजूनही विस्तार झालेला नाही. असे असतानाही या सरकारने अस्तित्वात आल्यापासून म्हणजे मागील २४ दिवसांत तब्बल ५३८ जीआर काढले असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे मंत्रिमंडळ अस्तित्वात नसल्याने हे जीआर प्रशासकीय पातळीवर काढले गेले असल्याचे समजते आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मागील महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णयांना स्थगिती देण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता. उध्दव ठाकरे यांचे सरकार अल्पमतात आल्यानंतर बेकायदेशीर रित्या हे जीआर काढण्यात आल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे शिंदे सरकारकडून हे निर्णय रद्द केले जात आहेत, असे सांगण्यात आले होते.
महाविकास आघाडी सरकार पेक्षा शिंदे सरकारने दुप्पट वेगाने जीआर काढले असल्याचे दिसत आहे. यामध्ये सर्वाधिक जीआर हे सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, सामान्य प्रशासन विभाग, जलसंपदा विभाग, महसूल आणि वन विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे आहेत. दरम्यान, संसदीय कार्य आणि माहिती तंत्रज्ञान विभाग यांची माहितीच उपलब्ध झालेली नाही.
शिंदे सरकारकडून सर्वाधिक या पाच खात्यांमध्ये जीआर काढण्यात आले आहेत. त्यामध्ये सार्वजनिक आरोग्य खात्यात ७३, पाणीपुरवठा व स्वच्छता खात्यात ६८ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ४३ सामान्य प्रशासन विभाग ३४ जलसंपदा विभाग, महसूल व वन विभाग आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य (३) प्रत्येकी २४ असे आहेत. त्याचबरोबर ग्रामविकास विभागातही २२ जीआर काढण्यात आले आहेत. कृषी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय २२, उच्च व तंत्रशिक्षण २१, गृह विभाग २०, आदिवासी विभाग १९, मृद व जलसंधारण १७, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य १४, सहकार, पणन व वस्त्रोद्योग १३, सार्वजनिक बांधकाम १३, कौशल्य विकास व उद्योजकता १२, महिला व बालकल्याण विभाग १० अश्याप्रकरे जीआर काढण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- विद्यार्थिनीला ओरडल्यामुळे शिक्षिकेला निर्वस्त्र करून बेदम मारहाण; पश्चिम बंगालमधील धक्कादायक घटना
- Ajit Pawar : शिंदे – फडणवीसांच्या हातात जास्त काही नाही, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजित पवार म्हणाले…
- Deepak Kesarkar | युवा सेना प्रमुख आता फिरायला लागले, या आधी ते कधीच दिसत नव्हते – दीपक केसरकर
- Deepak Kesarkar | आमच्या खासदारांच्या घरावरती मोर्चा काढला, कोणी दिला तुम्हाला अधिकार – दीपक केसरकर
- ajit pawar | बहुमत आहे तर मंत्रिमंडळ विस्तार का नाही?- अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

