मुंबई : आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन २४ दिवस लोटले. मात्र अजूनही या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या २४ दिवसात अनेकदा दिल्ली दौरे केले. प्रत्येक वेळेस वाटायचे कि आता मंत्रिमंडळ विस्तार होईल, पण तसेच झाले नाही. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शिंदे आणि फडणवीस यांना खडे बोल सुनावले आहेत.
जर तुमच्याकडे बहुमत आहे तर मग मंत्रिमंडळ विस्तार करण्यापासून तुम्हाला कुणी अडवलं आहे का?, असा संतप्त सवाल अजित पवार यांनी शिंदे आणि फडणवीस यांना विचारला आहे. पुढे ते असेही म्हणाले कि “राज्यात अतिवृष्टी सुरु झाल्यापासून मराठवाडा, विदर्भ आणि अन्य काही भागात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत आणि या सरकारच्या दृष्टीने ती शरमेची बाब आहे. अतिवृष्टीच्या झालेल्या भागातील शेतकऱ्यांना आणि नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करायला हवा आणि तातडीने अधिवेशन बोलावलं पाहिजे. कारण प्रत्येक भागात जे काही नुकसान झालं आहे ते तिथली परिस्थिती सगळ्यांसमोर मांडण्यासाठी अधिवेशन हाच मार्ग आहे. त्यामुळे एवढच जर बहुमत आहे, तर अधिवेशन घेण्यापासून कुणी अडवलं आहे. याच उत्तर त्यांनी दिलंच पाहिजे”
राज्यातील पूर स्थितीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि इतर काही नेत्यांनी मिळून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नावे एक पत्र पाठवले आहे या पत्रांमधून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Rahul Shewale | दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवावा – राहुल शेवाळे
- Ajit pawar | तिरुपती देवस्थान संदर्भात व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंवर अजित पवार म्हणाले, …
- IND vs WI : बीसीसीआयचे पैसे संपले? सामन्यात दीपक हुडाने घातली प्रसिद्ध कृष्णाची जर्सी, नेटकऱ्यांनी केले ट्रोल!
- Elon musk | गूगलच्या सहसंस्थापकाच्या पत्नीसह असलेल्या अफेअरच्या चर्चांवर एलोन मस्कची पहिली प्रतिक्रिया
- Nilesh Rane: “… आणि फक्त अंधारातच बाळासाहेब आठवतात”, निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

