Share

Ajit Pawar : शिंदे – फडणवीसांच्या हातात जास्त काही नाही, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजित पवार म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

Ajit Pawar । मुंबई : गेल्या महिन्यात राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ५० आमदार घेऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडले. पुढे त्यांनी भाजपशी हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केलं. मात्र या सर्व घडामोडी घडताना मागील काही दिवसांत शिवसेना पक्ष चांगलाच अडचणीत सापडला आहे. आमदारानंतर आता १२ खासदारांनी देखील एकनाथ शिंदे यांना समर्थन दर्शवल आहे. मात्र सरकार स्थापन होऊन आता एक महिना झाला तरी आजून मंत्रिमंडळ विस्तार नाही. यावरून विरोधक वारंवार ठाकरे सरकारवर टीका करत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आता सरकारवर निशाणा साधलाय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या हातात मंत्रिमंडळाचे फारसे काही दिसत नसून, दिल्लीतून जोपर्यंत हिरवा झेंडा मिळत नाही, तोपर्यंत हे काही करु शकत नाहीत, असे दिसत असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. राज्यातील अतिवृष्टी, कारभार यावर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. राज्यात अतिवृष्टीची स्थिती आहे, शेतकरी अडचणीत आहेत, अशा स्थितीत सरकारने तातडीने यावर उपाययोजना करायला हव्यात. तातडीने अधिवेशन बोलावण्याची गरज आहे, असे मत देखील त्यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील गेल्या आठवड्यात त्यांनी बंड केलं नाही. उठाव केला नाही. तर गद्दारी केली आहे, असं सांगतानाच शिवसेनेतून जे गेले ते गद्दारच आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच लाज असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवा, असं आव्हान देतानाच हे सरकार जास्त काळ चालणार नाही. दोन लोकांचं मंत्रिमंडळ आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे. ते कोसळणार म्हणजे कोसळणारच. हे लिहून घ्या, असंही आदित्य ठाकरे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!