🕒 1 min read
Chandrakant Patil । कोल्हापुर : काल राज्याच्या राजकीय वर्तुळात एक दुःखद घटना घडली. भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांचे कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 91 वर्षांच्या होत्या. कोल्हापुरातील संभाजीनगर येथे त्यांचे निधन झाले असून त्या ९१ वर्षाच्या होत्या.
चंद्रकांत पाटलांच्या आईच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील चंद्रकांत पाटलांना पत्र लिहलं आहे. श्री. चंद्रकांत दादा, आपल्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांचे वृद्धापकाळाने देहावसान झाल्याचे समजले. ही दुःखद बातमी ऐकून वाईट वाटले.
आईंना दीर्घायुष्य लाभले. आपले कार्यकर्तृत्व पाहून त्या समाधान पावल्या आणि निर्वतल्या. तरी देखील आईचे जाणे ही न भरून निघणारी पोकळी आहे. आपणांस व आपल्या कुटुंबीयांस या शोकप्रसंगातून सावरण्याचे बळ मिळो आणि आईच्या आत्म्यास चिरशांती मिळो ही प्रार्थना!
महत्वाच्या बातम्या :
- Rahul Shewale | दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवावा – राहुल शेवाळे
- Ajit pawar | तिरुपती देवस्थान संदर्भात व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंवर अजित पवार म्हणाले, …
- IND vs WI : बीसीसीआयचे पैसे संपले? सामन्यात दीपक हुडाने घातली प्रसिद्ध कृष्णाची जर्सी, नेटकऱ्यांनी केले ट्रोल!
- Elon musk | गूगलच्या सहसंस्थापकाच्या पत्नीसह असलेल्या अफेअरच्या चर्चांवर एलोन मस्कची पहिली प्रतिक्रिया
- Nilesh Rane: “… आणि फक्त अंधारातच बाळासाहेब आठवतात”, निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
