🕒 1 min read
मुंबई : शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे सध्या शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील काही भागांचा दौरा करत आहेत. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी पक्षाशी बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. शिवसेनेला या धक्क्यातून सावरण्यासाठी आणि शिवसेनेची मोट पुन्हा नव्याने बांधण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यावरूनच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“मुंबईतील मराठी माणसाचं अस्तित्व शिवसेनेने टिकवलं असं आम्हाला वाटत असतं म्हणून आम्ही शिवसेनेत जातो. मग मुंबई मराठी माणसाच्या ताब्यात राहावी यासाठी तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली नाही”, असा सवाल केसरकर यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच पुढे बोलताना त्यांनी आदित्य ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला देखील लगावला. ते म्हणाले कि,” युवासेनेचे प्रमुख आत्ता कुठे दिसायला लागले आहेत. शिवसेनेच्या शाखांमध्ये जात आहेत. आधी तर ते लोकांना दिसतही नव्हते. किती वेळा ते आपल्या ऑफिसमध्ये गेले? किती लोकांना भेटले?, याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल”
महत्वाच्या बातम्या:
- Deepak Kesarkar | आमच्या खासदारांच्या घरावरती मोर्चा काढला, कोणी दिला तुम्हाला अधिकार – दीपक केसरकर
- ajit pawar | बहुमत आहे तर मंत्रिमंडळ विस्तार का नाही?- अजित पवार
- Pravin Darekar | सत्ता असतानाच फिरले असते तर आता गट्टी जमवण्याची वेळ आली नसती – प्रवीण दरेकर
- Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांना मातृशोक; शरद पवारांनी पत्र पाठवत केले सांत्वन
- Rahul Shewale | दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवावा – राहुल शेवाळे


