🕒 1 min read
Gulabrao Patil । मुंबई : सध्या राज्यभर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सुरु आहे. ते आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. मात्र या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे यांच्या निशाण्यावर बंडखोर आमदार आहेत. मात्र शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या शाखांवर फिरावं लागत आहे. यासारखा आज दुसरे दुर्दैव नाही. उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांनी आधीच हे दौरे केले असते तर कदाचित ही वेळ आली नसती, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.
पुढे गुलाबराव पाटील म्हणाले कि, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे आजारी होते मात्र आदित्य ठाकरे हे तर तरुण होते. आता संपूर्ण राज्यात शिव संवाद यात्रेच्या माध्यमातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दौरे करत आहेत. आदित्य ठाकरे यांनी आधीच सर्व जिल्ह्यांचे दौरे केले असते तर कदाचित आज ही वेळ आली नसती. असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.
आम्ही शिवसेना सोडलेली नाही आहे. आम्ही खरे शिवसैनिक आहोत. त्यामुळे आमचा राजीनामा घेण्याचा विषयच येत नाही. आम्ही शिवसेना पक्ष सोडलेला नाही.आम्ही भगवा सोडलेला नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत आणि शिवसेनेचेच काम करत आहोत, असंही पाटील म्हणाले.
दरम्यान, आज नाशिकमध्ये बोलताना मी गद्दारांना उत्तर देणार नाही. त्यांना मी बांधिल नाही. मी उत्तरं द्यावीत एवढी गद्दारांची लायकीही नाही, गद्दारी का केली? ही लोकांची भावना आहे. गद्दारांनी ते पाहावी, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी सुहास कांदे यांना फटकारले आहे. मनमाड येथे शिवसेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी सुहास कांदे यांच्यावर नाव न घेता टीका केली. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :
- uday samant : आम्हाला गद्दार म्हणण्याचा कोणाला अधिकार नाही – उदय सामंत
- Monsoon special | पावसाळ्यात चहाबरोबर ‘हे’ पदार्थ खाण्याची मजा काही औरच; वाचा रेसिपी
- Aditya Thackeray : “मी उत्तरं द्यावीत एवढी गद्दारांची लायकीही नाही”; आदित्य ठाकरे आक्रमक
- Deepali Sayed | शिवसेना आमदार, खासदारांनी रशिया- युक्रेन युद्धाकडून शिकावे – दीपाली सय्यद
- Deepak Kesarkar : नेत्यांना अपमानित करून जनतेची दिशाभूल करू नका; केसरकरांचा आदित्य ठाकरेंना इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
