🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी (इतर मागासवर्ग) आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. आरक्षणासाठी आवश्यक असलेली तिहेरी चाचणी पूर्ण झाल्याचे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला 2 आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यास सांगितले आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने सांगितले की, जिथे निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे, त्यात कोणताही बदल होणार नाही. याच पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
— Raj Thackeray (@RajThackeray) July 20, 2022
“स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले, ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निकालाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करत आहे.”, असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.
ओबीसी समाजाला मिळालेल्या राजकीय आरक्षणावरून राज्यात श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. महाविकास आघाडी आणि सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु आहे. यावरूनच दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- IND vs WI : अर्शदीप सिंगला वनडे क्रिकेमध्ये पदार्पणाची संधी; पहिल्या सामन्यासाठी ‘अशी’ असेल भारताची रणनीती
- Sudhir Mungantiwar : सोनिया गांधी संविधानापेक्षा मोठ्या आहेत का? काँग्रेसच्या आंदोलनावरून सुधीर मुनगंटीवारांचा सवाल
- Gautam Adani | गौतम अदानी यांनी बिल गेट्सला टाकले मागे; संपत्तीत झाली ‘एवढ्या’ अब्ज डॉलरची वाढ
- Pune Cyber Crime | भाजपच्या चार महिला आमदारांची आर्थिक फसवणूक; आरोपी ताब्यात
- Vijay Wadettiwar : श्रेयवादापेक्षा OBC आरक्षण मिळाले याचा आम्हाला आनंद – विजय वडेट्टीवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
