Share

Devendra Fadnavis | सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, “आमची केस…”

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय संकट अद्याप संपलेले नाही. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होती. त्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करून राज्यात सरकार स्थापन केले आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या काही याचिकांवर आज सुनावणी पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने वकील कपिल सिब्बल तर दुसरीकडे शिंदे गटाच्या वतीने वकील हरीश साळवे यांनी जोरदार युक्तिवाद केला. या प्रकरणी पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार आहे. तसेच हे प्रकरण मोठ्या खंडपीठात जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजुने म्हणणे मांडण्यात आले. आमच्या जेष्ठ वकीलांनी सांगितलं की संविधान पीठाचा हा विषय आहे. त्यामुळे तो संविधान पीठासमोर जाणं महत्वाचे आहे. याबाबत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायालय १ तारखेला निकाल देणार आहे. आज झालेल्या सुनावणीवर आम्ही समाधानी आहोत. आम्हाला विश्वास आहे की आमची केस मजबूत आहे. त्यामुळे योग्य निर्णय आमच्या बाजूने होईल. तसेच परिस्थिती जैसे थे चा आदेश हा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाने एकमेकांना दिलेल्या नोटीशींसंदर्भातच आहे. काही लोक चुकीची माहिती पसरवत असून यावर विश्वास ठेवू नका.”

न्यायालयात काय घडले?

यावेळी हरीश साळवे म्हणाले की, “उद्धव गटाने दाखल केलेल्या याचिकांवर प्रतिज्ञापत्र दाखल करायचे आहे. अशा स्थितीत आठवडाभराचा अवधी देण्यात यावा. यावर सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी याचिकांना उत्तर म्हणून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे मान्य केले. आता अपात्रतेची कारवाई लागू होणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. अपात्रतेची कारवाई संपूर्ण लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात आहे.

सुप्रीम कोर्टाने साळवे यांना सांगितले की, राजकीयदृष्ट्या हे संवेदनशील प्रकरण आहे. पक्षात फूट पडलीचं नाही. तर अपात्र कसे ठरवणार, यादरम्यान कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणात न्याय मिळाला नाही तर देशातील प्रत्येक निवडून आलेले सरकार पाडण्याचा धोका वाढेल.

गटनेता हटवण्यावरूनही मोठा वाद

गटनेता पदावरुन शिवसेना आणि शिंदे गटात मोठा वाद सुरु आहे. कोर्टाने याबबात महत्वाचे निरीक्षण नोंदवले. गटनेता बदलणं हा पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे मत न्यायालयाने म्हटले आहे. एकनाश शिंदे यांनी बंड केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ठाकरेंनी पावलं उचलत शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवले होते. तसेच त्या ठिकाणी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

मात्र एखाद्या गटाला आपला नेता बदलावा वाटत असेल तर त्यात गैर काय असा युक्तिवाद हरीश साळवे यांनी केला? मात्र कुठेतरी दूर बसून मी नेता आहे सांगणं हे कुठल्या तत्वात बसत, असा युक्तिवाद ठाकरेंची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल यांनी केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!