🕒 1 min read
दिल्ली: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज माध्यमांशी बोलताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. “उद्धव ठाकरे यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी अविचारी पक्षाशी युती केली, असंघाशी संघ केले”, असा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच ज्यांच्याकडे सदस्य संख्या जास्त आहे, पक्ष त्यांचाच असतो, असे म्हणत अप्रत्यक्षपणे शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना रावसाहेब दानवे असेही म्हणाले की, “2019 मध्ये मातोश्रीवर बंद दाराआड जी चर्चा झाली तेव्हा मी देखील तिथे उपस्थित होतो. ज्या पक्षाचे जास्त उमेदवार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असा फॉर्म्युला ठरलेला होता. मात्र तो उद्धव ठाकरे यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी भाजपशी असलेली युती तोडली”.
महत्वाच्या बातम्या:
- Imtiaz Jalil : गुगलने संभाजीनगर उल्लेख केल्याने इम्तियाज जलील संतापले, थेट गुगललाच विचारला जाब
- uday samant : एकनाथ शिंदे दिल्लीला गेले मात्र सगळं लक्ष महाराष्ट्रात – उदय सामंत
- Udayanraje Bhosale । “संजय राऊत भगवान है…”; उदयनराजे संतापले
- Lok Sabha : शिंदे गटात सामील झालेल्या 12 खासदारांची पुढची रणनिती, लोकसभा अध्यक्षांकडे केल्या तीन मागण्या
- Om Birla : शिंदे गटात सहभागी झालेल्या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
