Share

Shivsena MP | राहुल शेवाळेंवर महिलेचा बलात्काराचा आरोप, CM शिंदेंना पत्र लिहून मागितला न्याय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून एका महिलेने न्याय मागितला आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचा आरोप महिलेने केला आहे. आज (19 जुलै, मंगळवार) शिंदे गटाने लोकसभा अध्यक्षांना पत्र देऊन विनायक राऊत हे आता लोकसभेतील नेते नसून राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी निवड केली आहे, असे आवाहन लोकसभा अध्यक्षांना केल्याची चर्चा आहे.

दरम्यान, बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिल्याने शेवाळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्लीत आहेत. उद्धव ठाकरेंची छावणी सोडून शिंदे गटात सामील झालेल्या 12 खासदारांनी आज दिल्लीत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. या खासदारांसोबत राहुल शेवाळेही उपस्थित होते.

संबंधित महिलेने मुख्यमंत्री शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “माझी तक्रार ऐकून घेण्यात आली नाही. पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही. आता माझ्यापुढे मरण्याशिवाय दुसरा मार्ग उरला नाही.” महिलेने हे पत्र ट्विटरवर शेअर केले आहे. पुरावे असूनही मुंबईतील अंधेरी येथील साकीनाका पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली जात नसल्याचा आरोप महिलेने केला आहे. मात्र पोलिसांनी अशी कोणतीही तक्रार मिळाली नसल्याचे सांगितले.

महिलेने राहुल शेवाळे यांच्यासोबत काही व्हिडीओ देखील ट्वीट केले आहेत. त्यामुळे राहुल शेवाळेंच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

https://twitter.com/BaxlaRinki/status/1549058710303121408

संबंधित महिलेने पत्रात लिहिले आहे की, “लग्नाच्या बहाण्याने खासदार राहुल शेवाळे 2020 पासून माझ्यावर बलात्कार करत असून मानसिक छळ करत आहेत. पत्नीपासून घटस्फोट घेऊ शकतो, असे ते मला सतत सांगत होते. मी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.”

https://twitter.com/BaxlaRinki/status/1549041889810083840

महिलेचा आरोप आहे की, राहुल शेवाळे तिला दिल्लीतील सरकारी निवासस्थानी जेवायला बोलवायचा आणि लग्नाच्या बहाण्याने संबंध ठेवायचा. तेव्हा खासदार शेवाळे यांनी कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी हजर राहण्यास तयार असल्याचे सांगितले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!