🕒 1 min read
पुणे : राज्यात गढूळ राजकारण पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडत राज्यात सरकार स्थापन केले. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना फोडल्याचा आरोप केला. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडावी, अशी मागणी शिंदे गटातील आमदार करत आहेत. या राजकीय गदारोळाच्या केंद्रस्थानी शरद पवार असल्याचे भासवल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रुपाली पाटील यांनी शिवसेना व शिंदे गटाला चांगलेच सुनावले आहे.
रुपाली पाटील म्हणाल्या, “शिवसेना पक्षातील काही लोक व त्यांचे बंडखोर आमदार यांच्यात काही झाले की आलेच शरद पवार साहेबांना मध्ये घ्यायला. बाबांनो तुमचे काम, तुमचे वाद स्वतःच्या हिंमतीवर करा. कशाला तुमचे खापर शरदजी पवार साहेबांवर फोडता. सत्तापिपासूमुळे वाण नाही पण गुण लागला वाटत तुम्हाला.”
शिवसेना पक्षातील काही लोक व त्यांचे बंडखोर आमदार यांच्यात काही झाले की
आलेच मा. शरद पवार साहेबांना मध्ये घ्यायलाबाबांनो तुमचे काम ,तुमचे वाद स्वतःच्या हिंमतीवर करा.
कशाला तुमचे खापर मा.शरदजी पवार साहेबांवर फोडता.#सत्तापिपासू मुळे वाण नाही पण गुण लागला वाटत तुम्हाला— Rupali patil thombare (@Rupalispeak) July 19, 2022
भाजपने शिवसेना फोडली –
रामदास कदम यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी बंड खोर नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे. बंडखोर शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी ही शिवसेना फोडली. स्वतःची कृती योग्य आहे, असे दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस वर खापर फोडले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी चांगल्या पद्धतीचा कारभार केला होता. खंबीरपने आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत. २०१९ चा राग घेऊन भाजपने पोलीस बळाचा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर करून शिवसेना फोडली, असा आरोप महेश तपासे यांनी केला आहे.
शरद पवार, अजित पवारांनी शिवसेना फोडली –
रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शरद पवारांनी डाव साधला. संधी पाहून त्यांनी शिवसेना फोडल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. तसेच अजित पवार यांचा प्रशासकीय अनुभव प्रचंड आहे, त्याच्या जोरावर त्यांनी देखील शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केल्याचे रामदास कदम म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- MNS to Uddhav Thackeray | “बाप-लेक आणि विश्व प्रवक्ते यांनी…” ; मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला
- Eknath Shinde | शिवसेना हायजॅक? “आमच्यासोबत १२ खासदार नाही तर एकूण…” ; एकनाथ शिंदेंचा दावा
- IND vs ENG : इंग्लंडविरुध्द मालिका विजयामुळे टीम इंडियाच्या ODI रेटिंगमध्ये सुधारणा; वाचा!
- Rishabh Pant : ऋषभ पंतने शॉट खेळण्यासाठी योग्य गोलंदाज निवडले; भारताच्या माजी दिग्गजाचं मोठं वक्तव्य
- Ben Stokes : ‘या’ कारणामुळे घेतली बेन स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती; म्हणाला,‘मी माझे शंभर टक्के…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
