🕒 1 min read
मुंबई: “माझ्या मतदारसंघातील पक्षकारांची ‘तारीख पे तारीख’ या त्रासातून सुटका व्हावी आणि वकीलांचीही सोय व्हावी म्हणून गेली दोन-अडीच वर्षे पाठपुरावा करुन मविआ सरकार असताना मी कर्जतला दिवाणी न्यायालय मंजूर करुन आणलं. पण या सरकारने सत्तेत येताच या निर्णयाला स्थगिती दिली.”, असा संताप व्यक्त करत राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
“कदाचित, राज्य पातळीवरील मोठ्या निर्णयांना स्थगिती देताना तालुका पातळीवरील दिवाणी न्यायालयासारख्या छोट्या निर्णयालाही स्थगिती देण्याचा निर्णय अनावधानाने झाला असावा. त्यामुळं माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, याबाबत आपण व्यक्तिशः लक्ष घालून या निर्णयावरील स्थगिती उठवावी.”, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
माझ्या मतदारसंघातील पक्षकारांची 'तारीख पे तारीख' या त्रासातून सुटका व्हावी आणि वकीलांचीही सोय व्हावी म्हणून गेली दोन-अडीच वर्षे पाठपुरावा करुन #मविआ सरकार असताना मी कर्जतला दिवाणी न्यायालय मंजूर करुन आणलं. पण या सरकारने सत्तेत येताच या निर्णयाला स्थगिती दिली.@mieknathshinde
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 17, 2022
तसेच केलेल्या कामाचं श्रेय घ्यायला हरकत नाही, पण न केलेल्या कामाचं श्रेय घेणारे माझ्या मतदारसंघात अनेकजण आहेत. कदाचित मी प्रयत्न करून मंजूर करून आणलेल्या दिवाणी न्यायालयाच्या बाबतीतही श्रेय घेण्यासाठी असे लोक पुढं यायला कमी करणार नाहीत. असेही रोहित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यास आणि त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम मंजुरी देण्यात आली होती. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. तसेच कालच्या मंत्रीमंडळ बैठकीत औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.
महत्वाच्या बातम्या:
- Sadabhau Khot : “संधी साधून सोयीस्कर लाईव्ह येणारे उध्दव साहेब…”, सदाभाऊंचा अजित पवारांवर निशाणा
- Sanjay Raut : “केसरकर, उदय सामंत पवारांच्याच शाळेचे प्रमाणपत्र घेऊन..”, संजय राऊतांचा टोला
- Sanjay Raut : “राज्य दिल्लीपुढे झुकणाऱ्या बाजारबुणग्यांच्या हाती…”, संजय राऊतांचा शिंदे सरकारवर निशाणा
- Deepali Sayed : एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; दिपाली सय्यद यांचे ‘ते’ ट्वीट चर्चेत
- CM Eknath Shinde : ठाण्याची पाणीटंचाई मिटणार; मुख्यमंत्र्यांकडून अतिरिक्त १२० दशलक्ष लिटर्स पाण्यासाठी मंजुरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
