Share

Sanjay Raut : “राज्य दिल्लीपुढे झुकणाऱ्या बाजारबुणग्यांच्या हाती…”, संजय राऊतांचा शिंदे सरकारवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत राज्यात शिंदे सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र अजूनही मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाहीये. अशा अनेक मुद्द्यांवरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना रोखठोकमधून शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

इतिहासाची पुनरावृत्ती सतत होत असते याची प्रचीती देणारा काळ सध्या महाराष्ट्रात चालू आहे. शिवाजी महाराजांचे नाव आपण घेत असतो. मराठय़ांतील दुही, घरचेच वासे राज्याला काळ झालेली ही स्थिती पाहून व्यथित मनाने शिवाजी महाराजांनी रायगडावर आपला देह ठेवला. दुही व विश्वासघात यांचे राजकारण त्या काळातही चालले. आजही चालले आहे. शिवाजी महाराजांची पुण्यतिथी व जयंती, राज्याभिषेकाचा उत्सव साजरा करण्याचा अधिकार आज कुणाला आहे? चंदराव मोरे व गणोजी शिर्क्याचेच राजकारण अजून चालू आहे. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

दिल्ल्लीच्या ज्या बादशहाच्या दरबारात मान वाकवायची नाही, या केवळ एका अभिमानाच्या मुद्दयावर शिवछत्रपतींनी भर मोगल दरबारात प्राणांची पर्वा न करता मराठयांच्या अस्मितेचा भव्योदात्त आविष्कार प्रकट केला, त्या दिल्लीच्या आजच्या दरबारात “आमचा महाराष्ट्रच नष्ट करा हो!” म्हणून मराठेच शिष्टमंडळे घेऊन जात आहेत. शिवसेनेतून एक गट दिल्लीने फोडला, तीच शिवसेना खरी असा आभास निर्माण केला जात आहे. शिंदे गटाचा उल्लेख श्री. देवेंद्र फडणवीस ‘शिवसेना’ असा करतात. तुमचे उद्धव ठाकरे यांच्याशी वैयक्तिक वैर आहे हे समजू शकतो, पण फुटलेल्या गटास शिवसेना म्हणून संबोधणे ही बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बेइमानी आहे. असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

आमदार, खासदार फुटले याचे आता कोणालाच आश्चर्य वाटत नाही. व्यक्तिगत स्वार्थ, सत्तेची अभिलाषा यांनी झपाटलेले मूठभर लोक सत्तेऽशिवाय जणू काही देशसेवाच नाही अशा तिरमिरीने एका गटाकडे धावत सुटले आहेत. याचा सर्वात जास्त आनंद भाजपला व सध्याच्या दिल्ली दरबारास होत असेल. मोगलाना सर्व मराठे सामील होण्याचाच हा प्रकार आहे. शिवाजीराजे ‘मराठा’ होते म्हणून जादा अभिमान बाळगणाऱ्या मराठा समाजातील अनेक नेत्यांनी (लोकांनी नव्हे!) महाराष्ट्राची बेअब्रू केली आहे.

विश्वासघाताचे व दुहीचे राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे. शिवछत्रपतींनंतर त्यांचा अभिमान बोलला तो फक्त लोकमान्य टिळकांच्या व बाळासाहेब ठाकरे यांच्या मुखातून. त्यानंतर महाराष्ट्राला तसा नेता लाभला नाही. आता तर राज्य दिल्लीपुढे झुकणाऱ्या बाजारबुणग्यांच्याच हाती गेले. हा बट्टय़ाबोळच आहे. अशा शब्दांत संजय राऊतांनी शिंदे सरकारवर टीका केली.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!