Share

CM Eknath Shinde : ठाण्याची पाणीटंचाई मिटणार; मुख्यमंत्र्यांकडून अतिरिक्त १२० दशलक्ष लिटर्स पाण्यासाठी मंजुरी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: ठाणे जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन जिल्ह्याला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या काळू धरणाच्या कामांना गती देण्यासाठी ३३६ कोटी रुपयांचा निधी भूसंपादनासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहेत. त्यामुळे आता ठाणेकरांच्या पाणीटंचाईचा प्रश्न मिटणार आहे.

यासोबतच भातसा आणि बारवी धरणातून प्रत्येकी ५० दशलक्ष लिटर तसेच मुंबई महापालिकेच्या कोटय़ातील २० दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेले पाणी कोपरी आणि वागळे इस्टेट परिसरासाठी देण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. यासोबतच साडेसहा दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी दिवा परिसराला देण्यात येणार आहे.

दरम्यान ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर मनपा क्षेत्रात आणि जिल्ह्याच्या इतर भागात पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठीच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तर मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे व वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. खड्डेमुक्त रस्त्यांसाठी एमएसआरडीसीने स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. ही यंत्रणा खड्डे बुजवण्याचे काम अहोरात्र करेल.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!