Share

Sadabhau Khot : “संधी साधून सोयीस्कर लाईव्ह येणारे उध्दव साहेब…”, सदाभाऊंचा अजित पवारांवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद चालू असताना पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला, त्याला एकनाथ शिंदे यांनी उत्तर द्यायला सुरू केलं तेवढ्यात देवेंद्र फडणवीसांनी थेट त्यांच्या समोरचा माईकच काढून घेतला आणि त्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर दिले. याचा व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला होता. यावरच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अडीच वर्षात मी उद्धव ठाकरेंचा माईक कधीच खेचला नसल्याचे म्हणत टोला लगावला होता. याला आता माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“अडीच वर्षात मी उद्धव ठाकरेंचा माईक कधीच खेचला नाही असे अजित पवार म्हणाले. मात्र तुम्हाला हे बोलायची संधीसुद्धा आज मिळते आहे. संधी साधून सोयीस्कर लाईव्ह येणारे तुमचे उध्दव साहेब काही तुम्हाला ती संधी देईनात.”, असा टोला सदाभाऊ खोत यांनी ट्वीट करत लगावला आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

अडीच वर्षांत मी कधीच उद्धवजींसमोरचा माईक खेचून स्वत:कडे घेतला नाही. ही तर सुरुवात आहे. आत्तापासून ओढाओढी असेल तर महाराष्ट्राने हे पाहावं, असा टोला अजित पवार यांनी लगावला होता.

दरम्यान पुन्हा एकदा फडणवीस मुख्यमंत्री शिंदे यांच्या कानात काहीतरी कुजबुज करताना दिसून आले. याचाही व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. देवेंद्र फडणवीस “एमएमआरडीएचा विषय राहिला” अशी कुजबूज करताना दिसून आले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे विरोधकांकडून मुख्यमंत्री फडणवीसांच्या नियंत्रणात असल्याची टीकाही आता करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!