🕒 1 min read
मुंबई: गेल्या काही दिवसात शिवसेना पक्षात मोठी उलथापालथ झाली. शिवसेनेचे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू समजल्या जाणाऱ्या अनेक नेत्यांनी त्यांची साथ सोडली. पक्षाशी बंड करून भाजपबरोबर युती केली. मात्र एवढे सगळे झाले असतानाही उद्धव ठाकरे यांनी त्यांचा संयम कधीही ढासळू दिला नाही. ते जेव्हाही कॅमेऱ्या समोर आले, तेव्हा त्यांनी अत्यंत शांतपणे आणि संयमाने स्वतःचे मत मांडले. त्यांच्या या स्वभावाचे अनेकांनी कौतुक केले. असाच एक किस्सा शिवसेनेचे कल्याण डोंबिवली महानगरप्रमुख विजय साळवी यांनी शिवसेना मेळाव्यात सांगितला.
साळवी म्हणाले, “मी मातोश्रीवर उद्धव साहेबांसोबत बसलेलो असताना एकनाथ शिंदे यांचा फोन आला आणि हे कळताच उद्धव साहेब दुसऱ्या खोलीत निघून गेले. माझे बोलणे पूर्ण झाल्यावर ते परत खोलीत आले. पण त्यांनी एकदाही विचारले नाही की, एकनाथ शिंदे काय म्हणत होते. त्यांचं आणि माझं नेमकं काय बोलणं झालं?, हे देखील त्यांनी विचारले नाही. यावरूनच कळत कि, आमचे साहेब किती सोज्वळ आहे”, हा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला. दरम्यान, कल्याण डोंबिवली हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहण्याची शपथ सर्व शिवसैनिकांनी घेतली.
महत्वाच्या बातम्या
- Vijay Shivtare : “तुम्ही काय माझी हाकलपट्टी करणार मीच…”, विजय शिवतारेंचा शिवसेनेला टोला
- Uddhav Thackeray | पालघर जिल्ह्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष शिंदे गटात सामील
- Mahesh Tapase | देवेंद्र फडणवीस ४० आमदारांचा प्रस्ताव घेऊन राज ठाकरेंकडे गेले होते?- महेश तपासे
- Sanjay Raut : “शिवसेनेच्या पंखाखाली राहून स्वाभिमान जपू नये…”, संजय राऊतांचे बंडखोर आमदारांना आव्हान
- Sanjay Raut : “…अपेक्षा न ठेवता आपला स्वतंत्र संसार मांडा”, संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
