Share

Vijay Shivtare : “तुम्ही काय माझी हाकलपट्टी करणार मीच…”, विजय शिवतारेंचा शिवसेनेला टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना नेते विजय शिवतारे (vijay shivtare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठींबा दिल्यामुळे त्यांची  शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. यानंतर विजय शिवतारे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवत चांगलाच टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला गळतीचे जणू ग्रहणच लागले आहे. त्यात सध्या शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे सेनेचा संघर्ष अजून संपण्याचे काही नाव घेत नाहीये.

दरम्यान विजय शिवतारे यांनी म्हटले कि, “तुम्ही काय माझी हाकलपट्टी करणार, मीच शिवसेना सोडलीये. 29 जून रोजी पत्रकार परिषद घेऊन मी माझी भूमिका स्पष्ट केली. आम्हाला महाविकास आघाडी अमान्य आहे. शिवसेनेत फूट पडण्यास संजय राऊतच जबाबदार असून त्यांच्यामुळेच सर्व काही घडत आहे. त्यांची उद्धव ठाकरेंबाबत आणि शरद पवाारांबाबत निष्ठा किती हे सर्वांना ठाऊक आहे.”

स्वतंत्र संसार मांडा – संजय राऊत

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच माध्यमांशी संवाद साधत बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. “शिवसेना सोडली म्हणल्यावर आता अपेक्षा न ठेवता आपला स्वतंत्र संसार मांडा. बंडामुळे पक्षाला काही एक फरक पडणार नाही. शिवसेना-शिवसेना करण्यापेक्षा पक्षाची स्थापना करून मतदारांपुढे जा , म्हणजे अस्तित्व लक्षात येईल. ही बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आहे आणि भविष्यातही राहिल.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

स्वाभिमानाचा मुद्दा घेऊन बंड केलेल्यांकडे आता स्वाभिमान दाखवून द्यायची संधी आहे. आता शिवसेनेच्या पंखाखाली राहून आपला स्वाभिमान जपू नये. अनेकांनी पक्ष सोडूनही शिवसेना नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवस उजाडत नाही त्यांना स्वत:चा स्वाभिमान दाखवून द्यावा. असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!