🕒 1 min read
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट निर्माण झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा दोन्ही गटाकडून केला जात आहे. हा वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला असून यावर अद्याप सुनावणी होणे बाकी आहे. या पार्श्वभूमीवरच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांना आपला स्वतंत्र संसार मांडा, असा सल्ला दिला आहे.
“शिवसेना सोडली म्हणल्यावर आता अपेक्षा न ठेवता आपला स्वतंत्र संसार मांडा. बंडामुळे पक्षाला काही एक फरक पडणार नाही. शिवसेना-शिवसेना करण्यापेक्षा पक्षाची स्थापना करून मतदारांपुढे जा , म्हणजे अस्तित्व लक्षात येईल. ही बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आहे आणि भविष्यातही राहिल.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
स्वाभिमानाचा मुद्दा घेऊन बंड केलेल्यांकडे आता स्वाभिमान दाखवून द्यायची संधी आहे. आता शिवसेनेच्या पंखाखाली राहून आपला स्वाभिमान जपू नये. अनेकांनी पक्ष सोडूनही शिवसेना नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवस उजाडत नाही त्यांना स्वत:चा स्वाभिमान दाखवून द्यावा. असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Aditya Thackeray : “युवासैनिकांनो, आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता…”, आदित्य ठाकरेंचे आवाहन
- Draupadi Murmu : “अवघ्या 15 मिनिटांपूर्वी मोदींनी फोन करून…”, द्रौपदी मुर्मू यांनी सांगितला ‘तो’ किस्सा
- Devendra Fadnavis : “ज्यांनी बांठिया आयोग नेमला, तेच आता…”, देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका
- Sanjay Raut : “आमदार-खासदार फोडून सरकारे बनविली…”, संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा
- Sanjay Raut : “हुकूमशहा हा एक डरपोक माणूस…”, असंसदीय शब्दांच्या यादीवरुन संजय राऊतांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
