🕒 1 min read
Devendra Fadnavis । मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (मनसे) यांची भेट घेतली. मुंबईतील दादर येथील राज ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ येथे दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र या भीतीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच या भेटीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला होता. यानंतर आता या सर्व चर्चनानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, मला असं वाटतं की या महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती आहे. त्या राजकीय संस्कृतीमध्ये एकमेकांशी संबंध ठेवणं हे कुठेही गैर नाही. राज ठाकरेंचं ऑपरेशन झालं त्यानंतर अनेक नेते त्यांना भेटायला गेले, मी तर स्वतः सभागृहात देखील त्यांना भेटायला जाणार असल्याचं उल्लेख करून सांगितलं होतं. मग मी त्यांना भेटायला गेलो तर कोणाला मळमळायचं कारण काय आहे? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांना ठाकरे-फडणवीस भेटीबाबत विचारले असता त्या म्हणाल्या कि, दरारा, प्रतिष्ठा या गोष्टी कर्तृत्व आणि कामातून होतात. कोणी कोणाच्या घरी गेलं याच्यातून होत नाहीत. ज्यांच्याकडे एक आमदार आहे त्यांच्या घरी १०५ आमदार असणारा नेता जातो. याचं काय करणार तुम्ही? कोण कसा विचार करतं हे मला माहिती नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात जे काही सुरु आहे ते सर्वसामान्यांच्या हितासाठी नाही, फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी सुरु आहे. अशी टीकाही त्यांनी केली.
महत्वाच्या बातम्या :
- Virat Kohli in ODI : विश्वचषक २०१९ नंतर भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा कोहलीच्या नावावर
- Bala Nandgaonkr | “मनसेचा ‘एकला चलो रे’ चा नारा काल ही होता अन…”; बाळा नांदगावकर यांचे सूचक विधान
- Cm Eknath Shinde : मी जाईन तिकडे माझं मंत्रालय, गाडीतूनही काम सुरूच; विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
- Supriya Sule | “राज्यात कोणीही कोणत्याही पक्षात फिरत आहे, त्यामुळे…”; सुप्रिया सुळेंचा दीपक केसरकरांना टोला
- Ajit Pawar : पूर्ण बहुमत असताना राज्याला मंत्रिमंडळापासून वंचित ठेवणं बरोबर नाही; अजित पवारांनी व्यक्त केली खंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
