Share

Cm Eknath Shinde : मी जाईन तिकडे माझं मंत्रालय, गाडीतूनही काम सुरूच; विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

Published On: 

Cm Eknath Shinde । मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात दिवसेंदिवस अनेक मोठे गौप्यस्फोट होतायत. महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर आता मंत्रिमंडळात कोणाला कोणाला स्थान मिळणार याबाबत मोठ्या चर्चा सुरु आहेत.तसेच सरकार स्थापन होऊन आता १५ दिवस झाले. मात्र अजूनही सरकार स्थापन झालं नाही. आता हाच मुद्दा विरोधी पक्षाने उचलून धरला आहे. मंत्रिमंडळ अजूनही स्थापन न झाल्याने शिंदे सरकारवर टीका होत आहेत. यानंतर यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिल आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले कि, मी जिकडे जाईन तिकडे माझं मंत्रालय असतं. अरे गाडीतूनही माझं काम सुरु आहे, लोकं माझ्याकडे येतात मी सही करून कामं करतोय, असं वक्तव्य करत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिल आहे. तसेच माझ्या हातात लोकं लेटर देतात. मी लगेच सही करतो. मेल फॉरवर्ड करतो. कारण आता मी मुख्यमंत्री आहे. माझा लिहिलेला शब्द महत्त्वाचं आहे. पण चर्चा करणाऱ्यांना करू द्यात. रोज सकाळी सात वाजता पूरपरिस्थितीचा आढावा घेतोय. अधिकाऱ्यांशी चर्चा आहे. सगळ्या टीम अलर्ट आहेत, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं.

दरम्यान, सध्या महाराष्ट्रभर मुसळधार पाऊस सुरूर आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची देखील त्यांनी पाहणी केली. सध्या राज्यात केवळ दोनच व्यक्ती कारभार पाहत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार हा सर्वस्वी शिंदे-फडणवीस यांचा अधिकार आहे. ते काही विरोधीपक्ष नेत्याचे काम नाही. त्यांच्याकडे पूर्ण बहुमतदेखील आहे. अशावेळी राज्याला मंत्रिमंडळापासून वंचित ठेवणे योग्य नाही. मात्र दुसरीकडे अनेकांना शब्द दिले आहेत. ते पाळले जातील की नाही, अशी शंका त्यांना वाटत असेल, असा टोला विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला लगावला.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!