Share

Sanjay Raut | “आता औरंगजेब तुमचा नातेवाईक कसा काय झाला”; संजय राऊत यांचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : उद्धव ठाकरे यांच्या सरकारने औरंगाबाद शहराचे नाव बदलून ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलून ‘धाराशिव’, असे ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाचे अनेक पक्षांनी स्वागत केले. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यावरूनच आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

“एका बाजूला शिवसेनेने हिंदुत्व सोडले म्हणून आक्रोश करतात आणि आता औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलण्याच्या आमच्या निर्णयाला स्थागिती देतात. औरंगाबाद आणि उस्मानाबादसंदर्भात लोकांचा आग्रह आहे, लोकभावना आहे. राजकीय आणि आर्थिक निर्णयासंबंधित आम्ही समजून घेऊ शकतो. मात्र या निर्णयाला स्थगिती का? औरंगजेब हा तुमचा अचानक नातेवाईक कसा काय झाला? औरंगजेब तुमचा कोण लागतो, म्हणून तुम्ही त्या निर्णयाला स्थगिती दिली आहे?”, असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!